नवी दिल्ली : अनेक ई-कॉमर्स कंपन्या स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्त खास सेलचे आयोजन करत आहेत. अॅमेझॉनचा ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल (Great Freedom Festival) आणि फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज (Big Saving Days) 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान सुरू होईल. या सणासुदीच्या काळात रिलायन्स डिजिटलने 6 ऑगस्टपासून डिजिटल इंडिया सेलची (Digital India Sale) घोषणा केली आहे.
बर्याच ऑफर आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, सिटी बँक, एसबीआय कार्ड आणि इतर बँकांसारख्या विशिष्ट क्रेडिट कार्डांसाठी आहेत. मात्र, बाजारात अशी काही क्रेडिट कार्ड्स आहेत, जी ऑनलाइन शॉपिंगला अधिक फायदेशीर करण्यासाठी खास तयार करण्यात आली आहेत. दरम्यान आम्ही बाजारात सध्या अशा 5 क्रेडिट कार्ड्सबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये ऑनलाइन शॉपिंगचे चांगले फायदे मिळतात.
Amazon Pay ICICI Bank Credit Card
Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून अॅमेझॉन अॅप किंवा वेबसाइटवर केलेल्या खरेदी करण्यासाठी प्राइम मेंबर्ससाठी 5 टक्के आणि नॉन-प्राइम मेंबर्ससाठी 3 टक्के अनलिमिडेट रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. अॅमेझॉनवर या कार्डद्वारे रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी 2 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. अॅमेझॉन व्यतिरिक्त कोठेही पेमेंट केल्यावर 1% अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. हे कार्ड लाइफटाइम फ्री आहे.
Flipkart Axis Bank Credit Card
Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून Flipkart आणि Myntra वर केलेल्या खरेदीसाठी 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डसह, Cleartrip, PVR, Uber, Swiggy, Cure.Fit, Tata 1MG आणि Tata Sky वर खरेदी करण्यासाठी 4 टक्के कॅशबॅक मिळतो. तर इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटवर 1.5 टक्के अनलिमिडेट कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे.
HDFC Bank Millennia Credit Card
HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड वापरून Amazon, Flipkart, Bookmyshow, Cult.fit, Myntra, Sony LIV, Swiggy, Tata CLiQ, Uber आणि Zomato वर खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळतो. याशिवाय, फ्यूल वगळता सर्व ट्रान्जक्शनवर (वॉलेट ट्रान्जक्शन आणि ईएमआयसह) 1 टक्के कॅशबॅक मिळत आहे.
SBI SimplyCLICK Credit Card
SBI SimplyClick क्रेडिट कार्डद्वारे Amazon, Apollo24X7, BookMyShow, Cleartrip, Eazydiner, Lenskart आणि Netmeds वर खरेदी केल्यार 10X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या कार्डद्वारे इतर ऑनलाइन खर्च करण्यासाठी 5X रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या कार्डची वार्षिक फी 499 रुपये आहे.
HSBC Cashback Credit Card
HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्ड सर्व ऑनलाइन खर्चांवर 1.5 टक्के कॅशबॅक देते (वॉलेट रीलोड्स वगळून) आणि इतर प्रकारच्या खर्चांवर 1 टक्के कॅशबॅक मिळते. या कार्डची वार्षिक फी 750 रुपये आहे.