Join us  

शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र ‘सेल’

By admin | Published: July 09, 2016 2:09 AM

ळभाज्या आणि शेतमाल नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आवश्यक माहिती व मदत करण्यासाठी सहकार खात्याकडून स्वतंत्र ‘सेल’ निर्माण करण्यात

नाशिक : फळभाज्या आणि शेतमाल नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आवश्यक माहिती व मदत करण्यासाठी सहकार खात्याकडून स्वतंत्र ‘सेल’ निर्माण करण्यात आला आहे. नाशिक बाजार समितीत शनिवारपासून व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारल्याने मुंबईसह अन्यत्र शेतमाल विक्रीसाठी नेण्याचे सोईचे व्हावे, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समिती, अडते व व्यापाऱ्यांची राहणार आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून सहा टक्के घेण्यात येणारी अडत भरण्यास विरोध करीत खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तर सरकारच्या निर्णयाची कसोशीने अंमलबजावणी करण्यासाठी सहकार खात्याने कंबर कसली आहे. नियमनमुक्तीच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश यापूर्वीच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिलेले आहेत. बाजार समित्यांनीही शेतकरी हिताच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र सेलची निर्मिती केली असून, तेथे मार्गदर्शनासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. प्रत्येक तालुक्यात सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी जागेचा शोध घेतला. आठवडे बाजारांजवळील जागेवर शेतमाल विक्रीसाठी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतमाल विक्रीची व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कऱ्हे यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)नाशिक जिल्ह्यात दररोज साधारणत: ४०० मेट्रिक टन शेतमाल विक्री होतो. त्यातील २०० मेट्रिक टन माल शेतकरी सध्या बाजार समितीऐवजी थेट ग्राहकांना विक्री करतात. आताही या माल विक्रीसाठी गावोगावी माल वाहतूकदारांची माहिती व त्यांचे फोन नंबर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रसंगी शेतकऱ्यांना प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागाचीही मदत होण्यासाठी आवश्यक ती तयारी सहकार खात्याने केल्याचे नीळकंठ कऱ्हे यांनी सांगितले.