Join us

निर्देशांक आला ३५ हजारांच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:39 AM

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले मंदीचे वातावरण, गुंतवणूकदारांनी नफा कमविण्यासाठी, तसेच परकीय वित्तसंस्थांकडूनही झालेली मोठ्या प्रमाणातील विक्री, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी घेतलेला सावध पवित्रा, यामुळे सहा सप्ताहांमधील वाढीला ब्रेक लागला. संवेदनशील निर्देशांक ३५ हजारांच्या खाली आला.

-प्रसाद गो. जोशीआंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले मंदीचे वातावरण, गुंतवणूकदारांनी नफा कमविण्यासाठी, तसेच परकीय वित्तसंस्थांकडूनही झालेली मोठ्या प्रमाणातील विक्री, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी घेतलेला सावध पवित्रा, यामुळे सहा सप्ताहांमधील वाढीला ब्रेक लागला. संवेदनशील निर्देशांक ३५ हजारांच्या खाली आला.मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ आशादायक वातावरणामध्ये झाला. बाजार वाढीव पातळीवर खुला झाला. मात्र, सप्ताहाच्या अंतिम दोन दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने निर्देशांक घसरले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५४.३२ अंश (०.१६ टक्के) खाली येऊन ३४९१५.३८ अंशांवर बंद झाला.राष्टÑीय शेअर बाजारामध्येही सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये घसरण झालेली बघावयास मिळाली. येथील निर्देशांक (निफ्टी) ७४.०५ अंश म्हणजे ०.६९ टक्के खाली येऊन १०६१८.२५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहात तो १०६९२.३० अंश होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांकही खाली आले. मिडकॅप १६५६१.०१ अंशांवर (घट ३५६.१७ अंश), तर स्मॉलकॅप १७९९१.४५ (घट २४८.५१) अंशांवर बंद झाले.कर्नाटकमधील निवडणूक तोंडावर आलेली असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत, नफा कमविण्याचे धोरण स्वीकारलेले दिसून आले. त्यामुळेच सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये बाजारावर विक्रीचा दबाव येत निर्देशांक खाली आले. परकीय वित्तसंस्थांनीही १.४८४२ अब्ज रुपयांची विक्री केली, तसेच देशांतर्गत वित्तसंस्थांनीही विक्रीचा मार्ग स्वीकारून नफा कमविला.अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमध्ये व्याजदरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारामधील खनिज तेलाचे वाढते दर आणि विविध आस्थापानांची कामगिरी, यामुळे गुंतवणूकदार चिंतेमध्ये पडलेले असल्याने जागतिक शेअर बाजारामध्ये मंदीचेच वातावरण होते. 

टॅग्स :निर्देशांकशेअर बाजारमुंबई