प्रसाद गो. जोशी
परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने सुरू असलेली विक्री, बाजाराच्या पसंतीला न उतरलेले आस्थापनांचे जाहीर झालेले तिमाही निकाल, कमी प्रमाणात झालेला पाऊस, स्थिर असलेले खनिज तेलाचे दर आणि घसरत असलेली रुपयाची किंमत यामुळे उभारी घेण्यासारखे काहीच नसल्याने बाजारावरील अस्वलाची पकड तिसºया सप्ताहातही कायम राहिली. आॅगस्टच्या व्यवहारांच्या पहिल्या दिवशी बाजार मात्र वाढला.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहातही मंदीचेच वारे होते. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक काहीसा खाली (३८,३३३.५२) खुला झाला. हीच या निर्देशांकाची सप्ताहातील सर्वाधिक पातळी होती. त्यानंतर तो ३७,६९०.४७ अंशांपर्यंत खाली गेला. सप्ताहाच्या अखेरीस मात्र त्यामध्ये काहीशी वाढ होऊन तो ३७,८८२.७९ अंशांवर बंद घाला. मागील सप्ताहाच्या तुलनेत त्यामध्ये ४५४.२२ अंश (१.२ टक्के) घट झाली.राष्टÑीय शेअर बाजारातही मंदीचेच वातावरण होते. येथील निर्देशांकात (निफ्टी) १३४.९५ अंशांची घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ११,२८४.३० अंशांवर बंद झाला. मागील तीन सप्ताहांमध्ये यामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आहे. क्षेत्रीय निर्देशांकांमधील घसरणही सुरूच आहे. मिडकॅप २२२.१५ अंशांनी (१.६ टक्के) घसरून १३,८५६.१९ अंशांवर, तर स्मॉलकॅप १३,०६०.३४ अंशांवर (घट २५०.०१ अंश म्हणजे २.५ टक्के) बंद झाले. जुलै महिन्याच्या फ्युचर व्यवहारांची सांगता झाल्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या व्यवहारांच्या पहिल्याच दिवशी बाजार काहीसा वाढला आहे. परकीय वित्तसंस्थांच्या विक्रीएवढीच खरेदी देशी वित्तसंस्थांनी केली. उशिराने आलेल्या पावसाने आतापर्यंत पावसाची तूट १९ टक्केअसल्याने बाजारात चिंता आहे. त्यातच उत्पादन क्षेत्रामधील मंदी, विविध आस्थापनांचे जाहीर झालेले निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने काळजी आहे. आगामी सप्ताहात फेडरल रिझर्व्हची, तसेच रिझर्व्ह बॅँकेची होणारी बैठक दिशादर्शक ठरू शकते.
परकीय वित्तसंस्थांनी काढले ३,७५८ कोटी
च्पाच महिने सातत्याने गुंतवणूक करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी जुलै महिन्यामध्ये भारतीय भांडवल बाजारातून ३,७५८ कोटी रुपये काढून घेतले आहेत. अर्थसंकल्पामध्ये अतिश्रीमंत गटावरील करामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आल्यापासून परकीय वित्तसंस्था सातत्याने विक्री करीत असलेल्या दिसून आल्या आहेत.
च्जुलै महिन्यामध्ये (१ ते २६ जुलै) परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवल बाजारातील समभागांमधून १४,३८२.५९ कोटी रुपये काढून घेतले आहेत. मात्र, याच कालावधीमध्ये कर्जरोख्यांमध्ये या संस्थांनी १०,६२४.१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याचाच अर्थ या कालावधीमध्ये परकीय वित्तसंस्थांनी ३,७५८ कोटी रुपये काढून घेतले आहेत.च्याआधी फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये या संस्था भारतीय भांडवल बाजारामध्ये सातत्याने गुंतवणूक करीत असलेल्या दिसून आल्या.