Join us

सलग दुसऱ्या सप्ताहात निर्देशांकात वाढ सुरूच

By admin | Published: May 22, 2017 12:46 AM

बाजारात सुरू असलेली सातत्यपूर्ण खरेदी, जीएसटीचे दर निश्चित केल्यानंतर, काही निवडक क्षेत्रांमधील समभागांची झालेली मोठी खरेदी, यामुळे बाजाराचे निर्देशांक सलग दुसऱ्या सप्ताहात

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीबाजारात सुरू असलेली सातत्यपूर्ण खरेदी, जीएसटीचे दर निश्चित केल्यानंतर, काही निवडक क्षेत्रांमधील समभागांची झालेली मोठी खरेदी, यामुळे बाजाराचे निर्देशांक सलग दुसऱ्या सप्ताहात वाढीव राहिले. संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठले. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे बाजाराला हे उच्चांक राखता मात्र आले नाहीत.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा पूर्वार्ध हा तेजीचा तर उत्तरार्ध साधारणत: विक्रीचा दिसून आला. बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने सप्ताहादरम्यान ३०७१२.३५ असा नवीन उच्चांक गाठला. सप्ताहाच्या उत्तरार्धात नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे निर्देशांक काहीसा खाली येत, सप्ताहाच्या अखेरीस तो ३०४६४.९२ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २७६.७७ अंश म्हणजे ०.९२ टक्के एवढी वाढ झाली. बाजारामधील उलाढाल गतसप्ताहापेक्षा वाढलेली असल्याचे दिसून आले.राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही (निफ्टी) सप्ताहादरम्यान नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. या सप्ताहामध्ये ९५३२.६० अशी नवीन उच्चांकी झेप या निर्देशांकाने घेतली. सप्ताहाच्या अखेरीस तो थोडासा खाली येऊन ९४२७.९० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २७ अंशांची वाढ झाली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप या निर्देशांकांमध्ये मात्र, या सप्ताहामध्ये घट झालेली दिसून आली.सप्ताहाच्या अखेरीस जीएसटीचे दर ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत बहुसंख्य वस्तुंवरील जीएसटीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे बाजाराच्या एफएमसीजी या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली. वाहन उद्योगासाठी मात्र, जीएसटी फारसा लाभदायक ठरणारा नसल्याने, या क्षेत्रातील आस्थापनांच्या समभागांना विक्रीचा फटका बसला. परिणामी, बाजाराचा आॅटो हा क्षेत्रीय निर्देशांक घटला आहे.