- प्रसाद गो. जोशी
जागतिक वातावरणातील अस्थिरतेचा बसलेला फटका त्याचबरोबर युद्धाची निर्माण झालेली भीती यामुळे शेअरबाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये वर्षाच्या पहिल्याच सप्ताहात घट झाली. मात्र मिडकॅप व स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झालेली दिसून आली.
सप्ताहाच्या प्रारंभी तेजीमध्ये असलेला बाजार उत्तरार्धात मात्र घसरला. बाजाराने मिश्र प्रतिक्रिया दिली. बीएसई सेन्सेक्स ०.२६ टक्क्यांनी, तर निफ्टी ०.१५ टक्क्यांनी घसरला. मात्र मिडकॅप व स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे १.२४ आणि ३.२६ टक्क्यांनी वाढले. सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ४९७.३२ कोटी रुपयांची, तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी २९.६१ कोटी रुपयांची खरेदी केली. अमेरिकेने इराणच्या लष्करप्रमुखांची हत्या केल्यानंतर युद्धाची शक्यता निर्माण झाल्याने बाजार घसरला.
>वर्षभरात सेन्सेक्सने दिली १२.५६ टक्के वाढ
बीएसईचा प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने कॅलेंडर वर्षामध्ये ५१८५.४१ अंशांची वाढ नोंदविली आहे. २०१८ च्या ३१ डिसेंबर रोजी हा निर्देशांक ३६,०६८.३३ अंशांवर होता. याचाच अर्थ वर्षभरामध्ये तो १२.५६ टक्के वाढला आहे. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टी या निर्देशांकाने १०.७३ टक्केइतकी वाढ नोंदविली आहे. वर्षभरामध्ये हा निर्देशांक १०,८६२.५५ अंशांवरून १२,१६८.४५ अंशांवर पोहोचला. वर्षभरात त्यामध्ये १३०५.९० अंशांची वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये मात्र अनुक्रमे ४७०.६२ अंश (३.१४ टक्के) व १००७.३२ अंश (७.३५ टक्के) घट झाली आहे.
>दृष्टिक्षेपात सप्ताह
निर्देशांक
सेन्सेक्स
निफ्टी
मिडकॅप
स्मॉलकॅप
बंद मूल्य
४१,४६४.६१
१२,२२६.६५
१५,११४.५५
१३,९८८.८९
बदल
- ११०.५३
- १८.८५
+ १८५.३३
+ ४४१.०८
वर्षाच्या पहिल्या सप्ताहात निर्देशांकांची थोडी घसरण
जागतिक वातावरणातील अस्थिरतेचा बसलेला फटका त्याचबरोबर युद्धाची निर्माण झालेली भीती यामुळे शेअरबाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये वर्षाच्या पहिल्याच सप्ताहात घट झाली.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 04:59 AM2020-01-06T04:59:38+5:302020-01-06T04:59:45+5:30