Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतानं दाखवलं मोठं मन! आपल्या मित्र देशाला ७५,००० टन तांदूळ देणार

भारतानं दाखवलं मोठं मन! आपल्या मित्र देशाला ७५,००० टन तांदूळ देणार

ऑगस्टमध्ये सरकारने भूतान, मॉरिशस आणि सिंगापूरला १.४३ लाख टन गैर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 11:30 AM2023-09-26T11:30:09+5:302023-09-26T11:31:06+5:30

ऑगस्टमध्ये सरकारने भूतान, मॉरिशस आणि सिंगापूरला १.४३ लाख टन गैर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली होती.

India 75,000 tons of rice will be given to our friendly country | भारतानं दाखवलं मोठं मन! आपल्या मित्र देशाला ७५,००० टन तांदूळ देणार

भारतानं दाखवलं मोठं मन! आपल्या मित्र देशाला ७५,००० टन तांदूळ देणार

जगभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतातही वाढली आहे.  तांदळाचे दरही वाढले आहेत. या वर्षी पाऊसही कमी प्रमाणात झाला आहे, यामुळे आता तांदळाचे उत्पादनही घटणार आहे. बाहेरच्या देशातून तांदळाची मागणी वाढली आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर आता भारताने मोठे मन दाखवत मित्र देशाला तांदुळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

iPhone 13 वर फ्लॅट २७ हजारांचा डिस्काऊंट, पाहा कधी आणि केव्हा स्वस्तात खरेदी करता येणार?

भारत आपल्या आखाती मित्र यूएईला हजारो टन तांदूळ निर्यात करत आहे. भारत सरकारने २५ सप्टेंबर रोजी यूएईला ७५,००० टन गैर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड मार्फत निर्यातीला परवानगी आहे, असं परकीय व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले आहे. देशांतर्गत पुरवठा वाढविण्यासाठी २० जुलै रोजी गैर-बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली असली तरी, त्यांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सरकारच्या विनंतीनुसार इतर देशांना निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यापूर्वी ऑगस्टमध्ये सरकारने भूतान, मॉरिशस आणि सिंगापूरला १.४३ लाख टन गैर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली होती. DGFT ने भूतानला ७९,००० टन गैर-बासमती पांढरा तांदूळ, १४,००० टन मॉरिशस आणि ५०,००० टन सिंगापूरला निर्यात करण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, यूएन एजन्सीच्या प्रमुखाने अलीकडेच म्हटले आहे की भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे जगभरातील किंमती वाढल्या आहेत.

एका शिपिंग कंपनीने निर्यातीवर अंकुश लावल्यानंतर अर्ध्या जगासाठी अत्यावश्यक असलेल्या पिकाच्या किंमती जवळपास १५ वर्षांमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा सुमारे ४० टक्के आहे.

Web Title: India 75,000 tons of rice will be given to our friendly country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.