Join us

आता भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश, हे 'खास' फोन तयार होतायत भारतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 9:07 AM

2014मध्ये भारतात तयार झालेल्या मोबाईल फोनची किंमत 3 बिलियन डॉलर होती. तर आता 2019 मध्ये ही किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते आज इंडियन इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित नव्या योजनेची घोषणा करणार आहेत.

ठळक मुद्दे 2014मध्ये देशात 60 मिलियन स्मार्टफोन तयार करण्यात आले होते. शाओमी इंडियाच्या सीईओंनी शेअर केले ट्वीट.2019मध्ये तयार करण्यात आलेल्या मोबाईलची किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे.

नवी दिल्ली : भारत आता जगतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईत उत्पादक देश बनला आहे. आतापर्यंत देशात 300 मोबाईल निर्मिती युनिट्स सुरू झाले आहेत, अशी माहिती कायदा आणि न्याय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सोमवारी दिली. 

भारत 330 मिलियन मोबाईल फोन तयार करण्यात आले आहेत. 2014मध्ये देशात 60 मिलियन स्मार्टफोन तयार करण्यात आले होते. तेव्हा केवळ 2 मोबाईल निर्मिती युनिट भारतात होते. 2014मध्ये भारतात तयार झालेल्या मोबाईल फोनची किंमत 3 बिलियन डॉलर होती. तर आता 2019मध्ये ही किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते आज इंडियन इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित नव्या योजनेची घोषणा करणार आहेत.

George Floyd death: अमेरिकेत 52 वर्षांनंतर सर्वात मोठा हिसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू

शाओमी इंडियाच्या सीईओंनी शेअर केले ट्वीट -शाओमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू कुमार जैन, प्रसाद यांचे ट्विट शेअर करताना म्हणाले, शाओमीचे 99 टक्के फोन भारतात तयार होत आहेत. यातील 65 टक्के पार्ट्स स्थानिक पातळीवरच विकत घेतले जात आहेत. कंपनीने पाच वर्षांपूर्वी येथे मोबाईल निर्मिती कंपनी सुरू केली आहे. 

आता आयफोनही बनतोय भारतात -अॅपल भारतात काही आयफोनचे मॉडेल्स आधीपासूनच तयार करत आहे. मात्र, आता ही कंपनी आपला अधिकांश उद्योग चीनमधून भारतात हलवण्याचा विचार करत आहे. मात्र अद्याप हे स्पष्ट नाही.

धक्कादायक दावा! चीन नव्हे, युरोपात होता कोरोनाचा पहिला रुग्ण; नोव्हेंबरमध्ये समोर आली होती पहिली केस

सॅमसंगने नोएडामध्ये बनवली जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी -सॅमसंगदेखील भारतातच फोन तयार करो. सॅमसंगने नोएडामध्ये मोबाईल तयार करणारे जगातील सर्वात मोठे मोबाइल युनिटदेखील तयार केले आहे. याशीवा आता हळू-हळू अनेक कंपन्या भारतात मोबाईलचे उत्पादन सुरू करणार आहेत

CoronaVirus News: ...तर फक्त स्वप्नच बनून राहणार 'चमत्कारिक' कोरोना व्हॅक्सीन? अतिघाई पडेल महागात

टॅग्स :मोबाइलसॅमसंगभारतअ‍ॅपल आयफोन ८ प्लसरविशंकर प्रसाद