नवी दिल्ली - भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सध्या भारताचा जीडीपी 3,750 अब्ज डॉलर एवढा आहे. याशिवाय, पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जापान तर चौथा क्रमांकावर जर्मनीचा क्रमांक लागतो. मात्र, क्रयशक्ती समतेच्या (Purchasing Power Parity) बाबतीत सध्या भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार या यादीत अमेरिका नाही, तर चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या बाबतीत चीन 30.3 लाख कोटी डॉलरसह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तसेच, अमेरिका 25.4 लाख कोटी डॉलरसह जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय?पर्चेसिंग पॉवर पॅरिटी हे देशांमधील आर्थिक उत्पादकता आणि राहणीमानाची तुलना करण्यासाठीचे एक पॉप्यूलर मायक्रोइकॉनमिक अॅनालिसिस मॅट्रिक आहे. पीपीपी ही एक इकॉनमिक थेरी आहे. जे 'बास्केट ऑफ गुड्स' अॅप्रोचच्या माध्यमाने विविध देशांच्या करन्सीची तुलना करण्यास कामी येते. अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास, पीपीपी हा एक असा थेरॉटिकल एक्सचेन्ज रेट आहे, ज्याच्या माध्यमाने आपण समान वस्तू आणि सेवा कुठल्याही देशात खरेदी करू शकता. याद्वारे कुठल्याही देशाच्या करन्सीची पर्चेसिंग पॉवर समजते.
उदाहरणार्थ, भारतात जे सामान खरेदी करण्यासाठी 1000 रुपये लागतात. तेच सामान खरेदी करण्यासाठी अमेरिकेत किती डॉलर द्यावे लागतील. अथवा इतर कुठल्याही देशात किती पैसे द्यावे लागतील. यालाच, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतात.
भारत तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था -पर्चेसिंग पॉवर पॅरिटीसोबत तुलना केल्यानंतर, भारत 11.8 लाख कोटी डॉलरसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे केवळ अमेरिका आणि चीन आहे. या यादीत जापान चैथ्या क्रमांकावर, तर रशिया 5.32 ट्रिलियन डॉलरसह पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच जर्मनी सहाव्या क्रमांकावर आहे.