मुंबई : ‘भारत बिलपे’ या केंद्र सरकारच्या बिल भरणा प्रणालीने कोटींचे उड्डाण घेतले आहे. मार्च २०१८मध्ये देशभरात ३.१५ कोटी व्यवहार यामार्फत झाले.
‘भारत बिलपे’ ही ‘यूपीआय’ (युनिफाइड पेमेंट इंटरफेरन्स) प्रणाली रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) तयार केली आहे. याच्या साहाय्याने वीज, पाणी, डिश टीव्ही, फोन-मोबाइल अथवा पाइप गॅस लाइन बिले भरता येतात. सध्या देशातील २० राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रणाली सुरू आहे. तेथील ७५ प्रकारच्या बिलांचा ग्राहकांना आॅनलाइन भरणा करता येतो. मार्च २०१७मध्ये या प्रणालीमार्फत देशभरात १.८० कोटी व्यवहार झाले होते. या मार्च महिन्यात आकडा ७५ टक्के वाढला.
‘भारत बिलपे’चे कोटींचे उड्डाण!
‘भारत बिलपे’ या केंद्र सरकारच्या बिल भरणा प्रणालीने कोटींचे उड्डाण घेतले आहे. मार्च २०१८मध्ये देशभरात ३.१५ कोटी व्यवहार यामार्फत झाले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:36 AM2018-04-14T01:36:18+5:302018-04-14T01:36:18+5:30