Join us  

भारत-कॅनडा तणावाचा व्यापारावर थेट परिणाम; ₹ 70,000 कोटींचा व्यवसाय धोक्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 4:05 PM

गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत.

India-Canada Business: गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर वाढलेला हा वाद अजूनच थांबलेला नाही. या वादामुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. या बिघडलेल्या संबंधामुळे दोन्ही देशामधील सूमारे 70,000 कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम पडणार आहे. 

दोन्ही देशांमधला मोठा व्यापारपीटीआयच्या अहवालानुसार, थिंक टँक जीटीआरआयने सोमवारी सांगितले की, भारत आणि कॅनडामधील राजनैतिक तणावाचा आतापर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, हा वाद जसजसा वाढत जाईल, तसातसा दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम पडेल. याचे कारण म्हणजे, दोन्ही देशांमधील आयात-निर्यात सातत्याने वाढत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय व्यापार $8.3 अब्ज होता, जो आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये $8.4 अब्ज (सुमारे 70,611 कोटी) झाला आहे.

सध्या व्यवसायावर कोणताही परिणाम नाहीअहवालात असेही म्हटले आहे की, कॅनडातून भारताची आयात $4.6 अब्ज झाली आहे, तर निर्यातीत किंचित घट होऊन $3.8 बिलियन झाली आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांमधील तणावाचा व्यापारावर फारसा परिणाम झालेला नाही, असे म्हणता येईल. मात्र, आगामी काळात तणाव आणखी वाढल्यास व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. कॅनेडियन पेन्शन फंडाने भारतात सुमारे 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर सुमारे 600 कॅनेडियन कंपन्या भारतात त्यांचा व्यवसाय करत आहेत.

AsiaPacific.ca च्या अहवालानुसार, 2013 ते 2023 पर्यंत कॅनेडियन पेन्शन फंडांद्वारे भारतात केलेली मोठी गुंतवणूक रिअल इस्टेट (3.8 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपेक्षा जास्त), वित्तीय सेवा (3 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपेक्षा जास्त) आणि औद्योगिक वाहतूक (सुमारे 2.6 अब्ज कॅनेडियन डॉलर) आहे. पायाभूत सुविधा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.

भारतीय कंपन्या कॅनडामध्ये हजारो नोकऱ्या देतातकॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) ने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कॅनडामध्ये 30 हून अधिक भारतीय कंपन्या व्यवसाय करतात. त्यांनी कॅनडात केलेली गुंतवणूक 40,446 कोटी रुपयांची आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून 17 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. या कंपन्यांचा R&D खर्च देखील 700 मिलियन कॅनेडियन डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोणत्या गोष्टींचा व्यापार होतो?भारताच्या बाजूने कॅनडात रत्न, दागिने आणि मौल्यवान खडे, औषध उत्पादने, तयार कपडे, यांत्रिक उपकरणे, सेंद्रिय रसायने, हलके अभियांत्रिकी वस्तू, लोह पाठवतो. दुसरीकडे, भारत कॅनडाकडून कागद, लाकूड लगदा, एस्बेस्टोस, पोटॅश, लोखंडी भंगार, तांबे, खनिजे आणि औद्योगिक रसायने खरेदी करतो.

 

टॅग्स :भारतकॅनडाव्यवसायगुंतवणूक