Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत आयातशुल्क अधिक आकारतो, अमेरिका आकारणार २५ टक्के आयात शुल्क

भारत आयातशुल्क अधिक आकारतो, अमेरिका आकारणार २५ टक्के आयात शुल्क

भारत हा अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:33 AM2019-03-04T05:33:36+5:302019-03-04T05:33:53+5:30

भारत हा अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले.

India charges higher import tariffs, 25 percent import duty on US | भारत आयातशुल्क अधिक आकारतो, अमेरिका आकारणार २५ टक्के आयात शुल्क

भारत आयातशुल्क अधिक आकारतो, अमेरिका आकारणार २५ टक्के आयात शुल्क

वॉशिंग्टन : भारत हा अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. किमान कर अथवा बरोबरीचा कर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कंजर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्सला (सीपीएसी) संबोधित करताना ते बोलत होते. ट्रम्प म्हणाले की, भारत आमच्या देशावर अधिक शुल्क आकारतो. यावेळी ट्रम्प यांनी यावेळी भारतासारख्या देशांशी असलेल्या जागतिक आणि व्दिपक्षीय संबंधांसह विविध मुद्यांवर भाष्य केले.
ट्रम्प यांनी अमेरिकन मोटरसायकल हर्ले- डेव्हिडसन मोटारसायकलचे उदाहरण देताना सांगितले की, जेव्हा आम्ही भारतात मोटारसायकल पाठवितो तेव्हा त्यावर १०० टक्के शुल्क आकारले जाते. पण, भारत आम्हाला मोटारसायकल पाठवितो तेव्हा
आम्ही काहीच शुल्क आकारत नाही. त्यामुळे हे शुल्क एकसमान असावे. हा मिरर टॅक्स (प्रत्युत्तरातील कर) असेल पण, परस्परांसारखाच
असेल. यावर्षी सुरुवातीला व्हाइट हाउसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी परस्पर शुल्क आकारण्याचे समर्थन केले होते. तथापि, भारताने हर्ले- डेव्हिडसन मोटरसायकलवरील शुल्क १०० टक्क्यांहून कमी करुन ५० टक्के टक्के केल्याबाबत आपण संतुष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थात, ही कपात पर्याप्त नाही तरीही, ठीक आहे, असेही ते म्हणाले.
ट्रम्प म्हणाले की, भारताला केवळ एक उदाहरण म्हणून आपण समोर मांडत आहोत. जेणेकरुन हे उदाहरणार्थ सांगितले जाऊ
शकेल की, अन्य देश कशाप्रकारे अमेरिकी उत्पादनांवर शुल्क आकारतात. आता वेळ आली आहे की, अमेरिकेनेही परस्पर बरोबरीचे शुल्क आकारावे. मी आपणावर
१०० टक्के शुल्क आकारणार नाही. पण, मी २५ टक्के शुल्क आकारणार आहे. या मुद्यावरुन संसदेत गदारोळ होत आहे. कारण, मी २५ टक्के कर आकारणार आहे.
>कर हटविण्याचे चीनला आवाहन
अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवरील शुल्क तत्काळ हटवावे, असे आवाहन अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनला केले आहे. चीनच्या आयात वस्तुंवरील शुल्क वाढविण्यासाठीची १ मार्चची कालमर्यादा ट्रम्प यांनी स्थगित केलेली आहे. त्याबदल्यात त्यांनी आता अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवरील शुल्क हटविण्याची मागणी केली आहे.
>शुल्क एकसमान असावे
जेव्हा आम्ही भारतात मोटारसायकल पाठवितो तेव्हा त्यावर १०० टक्के शुल्क आकारले जाते. पण, भारत आम्हाला मोटारसायकल पाठवितो तेव्हा आम्ही काहीच शुल्क आकारत नाही. त्यामुळे हे शुल्क एकसमान असावे.
- डोनाल्ड ट्रम्प

Web Title: India charges higher import tariffs, 25 percent import duty on US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.