मुंबई - भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या दरम्यान चीनची ग्रेट वॉल मोटार कंपनीने बुधवारी महाराष्ट्र सरकारसोबत करार केला आहे. ज्यादिवशी भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झटापट सुरु होती त्याचदिवशी हा करार महाराष्ट्रात करण्यात आला. ग्रेट वॉल मोटार कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत १ अरब डॉलर(७,६०० कोटी) ची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे.
कंपनीने जानेवारी महिन्यात जनरल मोटर्सकडून पुण्याच्या तळेगावजवळ प्लांटचं अधिग्रहण केले होते. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली ऑटो एक्सपोमधून भारताच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र सरकारशी केलेल्या करारानुसार तळेगाव पुणे येथे कंपनी अत्याधुनिक प्लांट तयार करणार आहे. यामुळे ३ हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल.
ग्रेट वॉल मोटर्स कंपनीचे भारतातील सहाय्यक संचालक पार्कर शी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र सरकारने या गुंतवणुकीचं समर्थन आणि प्रोजेक्टसाठी सहाय्य केल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. एकूण मिळून आम्ही भारतात १ अरब अमेरिकन डॉलर गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे जागतिक स्तरावर उत्पादन, रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट केंद्राचं निर्माण, आयात-निर्यात प्रक्रिया यामुळे ३ हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याची आमची तयारी आहे.
ग्रेट वॉल मोटर्स आपल्या SUV स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकलसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय बाजारात अशाप्रकारच्या कारची मागणी वाढत आहे. सध्या चीनविरोधात सुरु असलेल्या संघर्षामुळे देशवासियांच्या मनात चीनच्या वस्तूंबद्दल काही प्रमाणात तिरस्कार निर्माण झाला आहे. एका प्रमुख ऑटोमोटिव कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वोकल फॉर लोकल याचं आवाहन केले, त्यानंतर देशात परदेशी वस्तू वापराबद्दल राष्ट्रवाद निर्माण झाला. त्यामुळे कोणत्याही चीन कंपनीला भारतात गुंतवणूक करताना विलंब होत आहे. चीनची SAIC आपल्या एमजी मोटर ब्रँडसह भारतात पहिल्यापासूनच आहे.
सध्या देशात काय सुरु आहे?
सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या संघर्षामुळे चीनविरोधात भारतात संतप्त भावना आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कब मिलेगा करारा जबाब?; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल
शहीद सैनिकांच्या बलिदानाचा 'असा' बदला घेणार; चीनविरोधात भारताची तयारी
भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता