Join us

डाळीसह कडधान्याचा सर्वाधिक खप भारतात होतो !

By admin | Published: October 25, 2015 1:56 AM

जगातील सर्वांत जास्त कडधान्य उत्पादन करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. परंतु मागणीपेक्षा उत्पादन कमी असल्याने प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात आयात करावी

- नामदेव मोरे,  नवी मुंबईजगातील सर्वांत जास्त कडधान्य उत्पादन करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. परंतु मागणीपेक्षा उत्पादन कमी असल्याने प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. गतवर्षी देशात तब्बल २ कोटी २० लाख टन डाळी, कडधान्याची विक्री झाली असून, त्यात ३६ लाख टन माल आयात करावा लागला होता. देशभर डाळी व कडधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मोठ्या व्यापाऱ्यांनी गोडाऊन व कोल्ड स्टोरेजमध्ये डाळींचा प्रचंड साठा करून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. दसरा व दिवाळीमध्ये मागणी वाढत असल्याचा गैरफायदा घेऊन भाववाढ करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने भाव कमी करण्यासाठी शासनाने धाडसत्र सुरू केले. गोडाऊनमध्ये सापडलेला साठा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु सापडलेला साठा खूपच कमी आहे. प्रत्यक्षात हजारो टन माल अजूनही नवी मुंबई, पनवेल, शिळफाटा व देशात इतर ठिकाणच्या गोडाऊनसह कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवला आहे. जगात सर्वांत जास्त कडधान्याचे उत्पादन व खप भारतामध्ये आहे. गत तीन वर्षांत देशात ६ कोटी टन मालाची विक्री झाली. गतवर्षी २ कोटी २० लाख टन विक्री झाली. यातील १ कोटी ८४ लाख टनचे उत्पादन देशात झाले असून, ३५ लाख ५४ हजार टन माल आयात करावा लागला होता. देशात हरबरा व वाटाण्याची विक्री सर्वाधिक आहे. त्यानंतर तूरडाळ, मूगडाळ व उडीद डाळीचा खप होतो. विदेशातून प्रत्येक वर्षी ३५ ते ४० लाख टन कडधान्य आयात केले जाते. गुजरात व मुंबईमधील बंदरांमध्ये विदेशातून माल येऊन तो देशभर वितरित केला जातो. मुंबईतील बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये वाटाण्याची नियमित आवक सुरू असते. इतर धान्य जेएनपीटी बंदरात उतरवून त्याची विक्री होते. आयात केलेल्या कडधान्याची डाळ बनवून ती वितरित केली जाते. यापूर्वी डाळींच्या साठेबाजीवर नियंत्रण असल्याने भाव नियंत्रणात राहत होते. मात्र सर्वत्र प्रचंड साठेबाजी सुरू असल्यामुळे विक्रमी भाववाढ झाली आहे. साठा व आयात मालाच्या विक्रीकडे लक्ष ठेवल्यास साठेबाजी नियंत्रणात येऊ शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कडधान्य उत्पादन व आयातीविषयीचा तपशीलदेशातील कडधान्यांचे उत्पादन (आकडे हजार टनांमध्ये )वस्तू२०१२-१३२०१३-१४२०१४ - १५तूर३,०२२.७०३,१७०२,७५०हरभरा८,८३२.५०९,५३०८,२८०मूग१,१८६१,६१०१,३९०उडीद१,९४६१,७००१,६१०मसूर१,१३४उपलब्ध नाहीउपलब्ध नाहीइतर कडधान्ये२,२२०३,७८०४,४००एकूण१८,३४३१९,७८०१८,४३०भारतात कडधान्याची होणारी आयात (आकडे हजार टनांमध्ये)वस्तू२०१२-१३२०१३-१४२०१४ - १५वाटाणा१,३७०.८२१,३३०.४३१,६४७.७६हरभरा६९७.६३२७६.१३३०९.७१मूग, उडीद६४२.८४६२४.१२४९९.८६मसूर५०६.३९४६५.६१४४३.८५एकूण४०१३.२४३,६५४.७८३,६६३.५७या देशांमधून होते कडधान्यांची आयात वस्तूदेशवाटाणाकॅनडा, रशिया, अमेरिका, आॅस्ट्रिलिया, फ्रान्सहरभराआॅस्ट्रेलिया, रशिया, टान्झानिया, म्यानमार, अमेरिकामूग, उडीदम्यानमार, टान्झानिया, केनिया, आॅस्ट्रेलिया, मोझांबिक्यू मसूरकॅनडा, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, उझबेकिस्थान, तुर्कीतूरम्यानमार, टान्झानिया, मोझांबिक्यू, मालावी, केनियाजीवनावश्यक वस्तूंवर नियंत्रण हवे राज्य शासनाने एक वर्षापूर्वी डाळी व कडधान्ये बाजार समितीच्या नियंत्रणामधून वगळले आहे. भाववाढ कमी होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात एक वर्षात तूरडाळ तीनपट तर इतर डाळींच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. व्यापाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. मोठ्या भांडवलदारांनी व कमोडिटी एक्सचेंजच्या माध्यमातून अनेकांनी भाव कमी असताना खरेदी करून ठेवली असून, आता कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांची लूट सुरू केली आहे. ही मनमानी थांबविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारावर बाजार समिती किंवा शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे.