Lokmat Money > बिझनेस न्यूज > खासगी नोकरी करता? पुढल्या वर्षी होणार दमदार पगारवाढ; समोर आला आकडा

खासगी नोकरी करता? पुढल्या वर्षी होणार दमदार पगारवाढ; समोर आला आकडा

विलिस टॉवर्स वॅटसन संस्थेचा अहवाल; आशिया प्रशांत क्षेत्रातील असेल सर्वाधिक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 06:34 AM2021-10-22T06:34:38+5:302021-10-22T09:55:45+5:30

विलिस टॉवर्स वॅटसन संस्थेचा अहवाल; आशिया प्रशांत क्षेत्रातील असेल सर्वाधिक वाढ

india expected to see higher salary with 93 hike in 2022 report | खासगी नोकरी करता? पुढल्या वर्षी होणार दमदार पगारवाढ; समोर आला आकडा

खासगी नोकरी करता? पुढल्या वर्षी होणार दमदार पगारवाढ; समोर आला आकडा

नवी दिल्ली : भारतीय कंपन्या २०२२ मध्ये ९.३ टक्के वेतनवाढ देऊ शकतात, तसेच ही वेतनवाढ आशिया-प्रशांत क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ असेल, असे विलिस टॉवर्स वॅटसन या संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. 

अहवालात म्हटले आहे की, भारतीय कंपन्यांपेक्षा  चिनी कंपन्या कमी वेतनवाढ देतील असा अंदाज आहे. आगामी वर्षात चीनच्या कंपन्या  ६ टक्के वेतनवाढ देणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील वेतनवाढ ३.८ टक्के आणि व्हिएतनाममधील वेतनवाढ ८ टक्के असेल, असेही अहवाल सांगतो. आयनने सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अहवालात भारतीय कंपन्या ९.४ टक्के वेतनवाढ देतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होते. विलिस टॉवर्स वॅटसनची अनुमानित वेतनवाढ या अहवालाशी जुळणारीच आहे. आयटी, रिटेल आणि औषधी या क्षेत्रांत सर्वाधिक वेतनवाढ दिली जाण्याची शक्यता आहे, असे विलिस टॉवर्स वॅटसनने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

अहवालात म्हटले आहे की, २०२१ मध्ये ८ टक्के वेतनवाढ दिली गेली आहे. २०२२ मध्ये वेतनवाढीत सुधारणा होण्याच्या अनुमानामागे कोरोना साथीतील सुधारणा हे प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे, यंदाही (सन २०२१) भारताची वेतनवाढ आशिया-प्रशांत विभागात सर्वाधिकच होती. 

Web Title: india expected to see higher salary with 93 hike in 2022 report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.