नवी दिल्ली/सिंगापूर : विद्यमान जागतिक आर्थिक परिस्थितीत भारत एक ‘चमकदार बिंदू’ असल्याचे सिंगापूरच्या एका वरिष्ठ मंत्र्याने संबोधले असून, भारत हाच संपूर्ण जगात वेगाने आर्थिक वृद्धी करणारा देश असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जानेवारीत भारतीय कंपन्यांचा विश्वास वाढला असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले
आहे.
सिंगापूरचे व्यापार आणि उद्योगमंत्री एस. ईश्वरन यांनी भारताची ही प्रशांसा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विविध आर्थिक पुढाकार आणि सुधारणा यामुळे देशाच्या विकासाला प्रोत्साहन मिळेल.
सिंगापुरातील भारतीय उच्चायुक्त विजय ठाकूरसिंह यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ईश्वरन म्हणाले की, चालू वर्षी भारत सर्वात वेगवान आर्थिक वृद्धी करणारा देश ठरेल, असे म्हटले जात आहे. २0१५ च्या पहिल्या सहामाहीत भारत हाच सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारा देश ठरला. या काळात भारतात नवीन प्रकल्पांसाठी ३१ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. भारत आणि सिंगापूर यांनी आर्थिक सहकार्य केल्यास दोघांनाही त्याचा फायदा होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारत सर्वाधिक वेगाने वृद्धी करणारा देश
विद्यमान जागतिक आर्थिक परिस्थितीत भारत एक ‘चमकदार बिंदू’ असल्याचे सिंगापूरच्या एका वरिष्ठ मंत्र्याने संबोधले असून, भारत हाच संपूर्ण जगात वेगाने आर्थिक वृद्धी
By admin | Published: January 28, 2016 02:03 AM2016-01-28T02:03:49+5:302016-01-28T02:03:49+5:30