India First Billionaire : एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असं सांगितलं जातं. आजही जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतीयांची नावे कायम टॉपमध्ये असतात. जेव्हा भारतीय श्रीमंतांचा विषय निघतो तेव्हा आपसुक मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि टाटा-बिर्ला यांसारख्या लोकांची नावे मनात येतात. जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक देशातील कुबेर आहेत. तर थांबा थोडं इतिहासात मागे गेला तर ह्यांची सपत्ती म्हणजे किस झाड पत्ती असेच तुम्ही म्हणाल.
देशात असा एक श्रीमंक व्यक्ती होऊन गेला ज्यांच्याकडे सोन्याच्या आणि हिऱ्याच्या खाणी होत्या. बागेत सोन्याच्या विटांनी भरलेले ट्रक उभे असायचे. एव्हढचं नाही तर 185 कॅरेटचा जेकब डायमंड त्यांच्या कागदपत्रांवर पेपरवेट म्हणून वापरला जात होता. 1940 मध्ये त्यांची संपत्ती 236 अब्ज डॉलर्स होती. त्यावेळी ते केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. या व्यक्तीचं नाव आहे, हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान.
टाईम मासिकाच्या कव्हर पेजवरही मिळालं स्थान
मीर उस्मान अली खान यांना 1937 मध्ये टाईम मासिकाच्या कव्हर पेजवर स्थान मिळालं होतं. टाइम्स नाऊने त्याच्या 185 कॅरेटच्या जेकब डायमंडची किंमत 1000 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यांची बहुतेक संपत्ती 1930 ते 1940 दरम्यान सरकारजमा झाली होती. बिझनेस स्टँडर्डच्या कागदपत्रांनुसार, 1940 पर्यंत त्यांची संपत्ती 236 बिलियनवर पोहोचली होती. अमाप संपत्ती असूनही मीर उस्मान साध्या राहणीसाठी प्रसिद्ध होते. साधा कुर्ता पायजमा ते घालायचे. अनेकदा तर साध्या चप्पल आणि शूजमध्येही पाहायला मिळायचे. 35 वर्षे ते त्यांच्या एकाच तुर्की टोपीमध्ये दिसले.
भारतीय सैन्याने हल्ला करून संपवली निजामाची राजवट
निजामाच्या बेडरूममध्ये एक जुना पलंग होता. तिथे साधे फर्निचर आणि ॲशट्रे पडलेला असायचा. ही खोली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आहे, असं सांगितलं असतं तर लोकांनी वेड्यात काढलं असतं. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबादच्या निजामाने भारताऐवजी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर सप्टेंबर 1948 मध्ये भारतीय लष्कराने हैदराबादवर हल्ला केला. याला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आलं होतं. या हल्ल्यात निजामाची राजवट संपुष्टात आली. सोबत त्यांची संपत्तीही सरकारकडे गेली.