Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताचा परदेशी व्यापार 800 अब्ज डॉलर्सच्या पुढे; स्मार्टफोन निर्यात तिपटीने वाढली

भारताचा परदेशी व्यापार 800 अब्ज डॉलर्सच्या पुढे; स्मार्टफोन निर्यात तिपटीने वाढली

गेल्या काही वर्षांपासून परदेशी व्यापारात भारत सातत्याने प्रगती करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 03:45 PM2023-08-21T15:45:28+5:302023-08-21T15:45:38+5:30

गेल्या काही वर्षांपासून परदेशी व्यापारात भारत सातत्याने प्रगती करत आहे.

India Foreign Trade, India's foreign trade surpasses 800 billion dollars; Smartphone production has tripled | भारताचा परदेशी व्यापार 800 अब्ज डॉलर्सच्या पुढे; स्मार्टफोन निर्यात तिपटीने वाढली

भारताचा परदेशी व्यापार 800 अब्ज डॉलर्सच्या पुढे; स्मार्टफोन निर्यात तिपटीने वाढली

India Foreign Trade : गेल्या काही वर्षांपासून भारत, परदेशी व्यापार सेवा क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे. या कामगिरीमुळे 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांतच भारताच्या परदेशी व्यापाराने $800 अब्जाचा आकडा पार करण्यात यश मिळवले आहे. थिंक टँक जीटीआरआयने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, भारताची निर्यात जानेवारी-जून 2023 या कालावधीत 1.5 टक्क्यांनी वाढून $385.4 अब्ज झाली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत $379.5 अब्ज होती. जानेवारी-जून 2023 दरम्यान आयात 5.9 टक्क्यांनी घसरून $415.5 अब्ज झाली आहे, जी जानेवारी-जून 2022 दरम्यान $441.7 अब्ज होती.

परदेशी व्यापारात 2.5 टक्के वाढ झाली
रिपोर्टनुसार, 2023 च्या पहिल्या सहामाहीत भारताचा परदेश व्यापार गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5 टक्क्यांनी वाढून $800.9 अब्ज झाला आहे. स्टँडअलोन आधारावर, वस्तूंची निर्यात 8.1 टक्क्यांनी घसरून $218.7 अब्ज झाली असून, आयात 8.3 टक्क्यांनी घसरुन $325.7 अब्ज झाली आहे. विशेष म्हणजे,  जानेवारी-जून 2023 दरम्यान सेवांची निर्यात 17.7 टक्क्यांनी वाढून $166.7 अब्ज झाली आहे, तर आयात 3.7 टक्क्यांनी वाढून 89.8 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

स्मार्टफोनची निर्यात तिपटीने वाढली
भारतातील स्मार्टफोन निर्यात झपाट्याने वाढत आहे. भारताने जानेवारी-जून 2023 दरम्यान $7.5 अब्ज किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले. हा आकडा मागील वर्षी याच कालावधीतील $2.5 अब्जाच्या तिप्पट आहे. यावरुन स्मार्टफोन निर्मितीत भारत वेगाने वाढ करत असल्याचे जाणवते.

Web Title: India Foreign Trade, India's foreign trade surpasses 800 billion dollars; Smartphone production has tripled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.