Join us

बुलेट प्रूफ जाकीट तयार करण्यात भारत चौथा देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 5:45 AM

भारतीय मानक विभागाच्या (बीआयएस) मानकानुसार तयार केल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या पहिल्या बुलेट प्रूफ जाकीट्सची शंभर देशांत निर्यात केली जात आहे.

- एस. के. गुप्ता  नवी दिल्ली : भारतीय मानक विभागाच्या (बीआयएस) मानकानुसार तयार केल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या पहिल्या बुलेट प्रूफ जाकीट्सची शंभर देशांत निर्यात केली जात आहे. मोदी सरकारने लष्कर आणि निमलष्कर दलातील जवानांच्या सुरक्षेसाठी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात उचलले हे मोठे पाऊल आहे. बीआयएसने यासाठी निश्चित केलेल्या मानकाची विदेशात प्रशंसा होत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीनंतर बुलेट प्रूफ जाकीटसाठी मानक निश्चित करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे, असे केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व नागरीपुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.बुलेट प्रूफ जाकीटसाठी मानक दर्जा निश्चित करण्यासाठी बीआयएसने डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तज्ज्ञांचे सहकार्य घेतले. याच मानकानुसार जाकीट्सच्या खरेदीसाठी निविदा जारी केल्या जात आहेत.

टॅग्स :जम्मू-काश्मीरभारत