Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानी-अदानींसह देशातील 500 उद्योगपतींना G-20 चे निमंत्रण, यामागे मोठी योजना...

अंबानी-अदानींसह देशातील 500 उद्योगपतींना G-20 चे निमंत्रण, यामागे मोठी योजना...

दिल्लीतील भारत मंडपम येथे 9 सप्टेंबर रोजी या शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:50 PM2023-09-07T18:50:12+5:302023-09-07T18:50:31+5:30

दिल्लीतील भारत मंडपम येथे 9 सप्टेंबर रोजी या शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

India G20 Summit: 500 industrialists of the country including Ambani-Adani invited to G-20 | अंबानी-अदानींसह देशातील 500 उद्योगपतींना G-20 चे निमंत्रण, यामागे मोठी योजना...

अंबानी-अदानींसह देशातील 500 उद्योगपतींना G-20 चे निमंत्रण, यामागे मोठी योजना...

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी G-20 शिखर परिषद होणार आहे. या परिषदेसाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. 9 सप्टेंबर रोजी दिल्लीतील भारत मंडपण येथे शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे, यात भारतातील प्रमुख उद्योगपती सामील होणार आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह देशातील सुमारे 500 बड्या उद्योजकांना या शाही भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिल्डा आणि इतर अनेकांचा समावेश आहे. देशातील परकीय गुंतवणूक, पब्लिक-प्रायव्हेट पार्टनर्शिप मॉडेल (PPP) आणि देशी-विदेशी कंपन्यांमधील करार, यासह अर्थव्यवस्थेच्या सर्व बाबी लक्षात घेऊन उद्योगपतींनी या कार्यक्रमात सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

9 सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे आयोजित डिनरमध्ये विविध देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. यासोबतच भारत सरकारला देशातील व्यवसाय आणि गुंतवणुकीतील उपलब्धी सांगण्याची संधी मिळणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील व्यवसायाची उत्तम इको-सिस्टम, आत्मनिर्भर भारत यासह सर्व योजनांवर प्रकाश टाकू शकतात. विशेष म्हणजे, G-20 चा उद्देश या गटातील सर्व देशांमधील व्यावसायिक संबंधांना उंचीवर नेणे हा आहे. देशातील आघाडीचे उद्योगपती यातील एक प्रमुख दुवा आहेत, त्यादृष्टीने त्यांना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
 

Web Title: India G20 Summit: 500 industrialists of the country including Ambani-Adani invited to G-20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.