Join us

भारताने गेल्या वर्षी २५ लाख पर्यटकांना दिला ई-व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 4:30 AM

भारताने गेल्या वर्षी २५ लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला. हे प्रमाण २०१५ या वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत पाचपट आहे. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या २६ वरून २१ पर्यंत कमी करण्यात आली आहे.

 नवी दिल्ली - भारताने गेल्या वर्षी २५ लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला. हे प्रमाण २०१५ या वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत पाचपट आहे. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या २६ वरून २१ पर्यंत कमी करण्यात आली आहे.

यासंदर्भात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिसाच्या उपश्रेणींची संख्या १०४ वरून ६५ इतकी करण्यात आली आहे. २०१५ साली इमिग्रेशन विभागाने ५.२९ लाख ई-व्हिसा जारी केले होते. गेल्या वर्षी हीच संख्या २५.१५ लाख इतकी झाली. भारतीय दूतावासातर्फे देण्यात येणाºया पेपर व्हिसाची संख्या घटली आहे. २०१५ साली अशा व्हिसांची ४५ लाख इतकी असलेली संंख्या २०१८ साली ३५ लाख झाली. भारताकडून १६६ देशांतील पर्यटक, नागरिकांना ई-व्हिसा देण्यात येतो. पर्यटन, वैद्यकीय, व्यावसायिक काम, कॉन्फरन्सला हजर राहणे अशा कारणांकरिता अर्ज केल्यापासून ७२ तासांत ई-व्हिसा मिळतो. वेब शो, मालिका, चित्रीकरण स्थळे निवडण्यासाठी दौरा करणे अशा कारणांसाठी फिल्म व्हिसाही देण्यात येतो. फिल्म व्हिसा असलेल्या विदेशी पर्यटकाला आता भारतात १८० दिवस राहायची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विदेशी चित्रपट निर्माते, अभिनेत्यांकडून भारतात होणाºया चित्रपट चित्रीकरणाला आणखी वेग येईल, असे मानले जाते.इंटर्नशिप व्हिसाला विशेष महत्त्वपर्यटन व्हिसा देतानाही नियमात काही बदल करण्यात आले आहेत. अल्पमुदतीचे, सहा महिने कालावधीचे स्थानिक भाषा, संगीत, नृत्य, कला, शिल्पाकृती, स्वयंपाक यांचे अभ्यासक्रम, औषधे व्यवहार यांच्यासाठी पर्यटन व्हिसा उपलब्ध करण्यात आला. आता कोणताही विदेशी विद्यार्थी त्याच्या इंटर्नशीपदरम्यान केव्हाही भारतात येऊ शकतो. स्वदेशी कंपन्यांत इंटर्नशीप करायची झाल्यास त्याला वार्षिक कमीत कमी ३.६ लाख रुपये वेतन मिळेल. काही वर्षांपूर्वी हे वार्षिक प्रमाण ७.८ लाख रुपये इतके होते. त्यामुळे अधिकाधिक इंटर्नशिप व्हिसा देणे भारताला शक्य होणार आहे.

 

टॅग्स :व्हिसाभारत