Join us

India GDP Growth Rate: ओमायक्रॉनच्या सावटावर मोठी बातमी; देशाचा जीडीपी 8.4 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 6:49 PM

India GDP Growth Rate: कोरोनाच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. यातून देश सावरला आहे.

जगावर ओमायक्रॉनचे सावट असताना भारतासाठी एक दिलासा देणार बातमी आली आहे. कोरोनाने पुरती उद्ध्वस्त झालेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी ठाकली आहे. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ 8.4 टक्के राहिली आहे. गेल्या वर्षी याच काळात भारताची अर्थव्यवस्था उणे 7.4  टक्क्यांवर गेली होती. यंदाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल 2021 ते जून 2021 मध्ये भारताच्या जीडीपी ग्रोथमध्ये 20.1 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे GDP (Q2 GDP) निकाल जाहीर केले आहेत. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के राहिला आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचे मोजमाप करण्यासाठी जीडीपी हा सर्वात अचूक उपाय आहे. जीडीपीमध्ये झपाट्याने सुधारणा झाल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये ७.५ टक्क्यांची घसरण झाली. तर तिसर्‍या तिमाहीत GDP 0.4% होता. चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) जीडीपी वाढीचा दर 1.6 टक्के नोंदवला गेला. अशा प्रकारे, आर्थिक वर्ष 2020-21 साठी GDP वाढीचा दर -7.3% टक्के होता.

स्थिर किंमतींवर (2011-12) जीडीपी 2021-22 च्या एप्रिल-सप्टेंबर कालावधीत 68.11 लाख कोटी रुपये असा अंदाज आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 59.92 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) ती 13.7 टक्के वाढ दर्शवते, जी मागील आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत 15.9 टक्क्यांनी घसरली होती. कोविड-19 महामारी रोखण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी देशव्यापी 'लॉकडाऊन' लागू केला होता. 2021 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत चीनचा विकास दर 4.9 टक्के होता.

टॅग्स :अर्थव्यवस्थाकोरोना वायरस बातम्या