नवी दिल्ली : थेट गुंतवणुकीचा विचार करता २0१५ मध्ये भारताने प्रथमच चीनला मागे टाकल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत भारत एक आकर्षक स्थान बनल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.‘फायनान्शियल टाइम्स’च्या ‘एफडीआय इंटेलिजन्स’ या शाखेने तयार केलेल्या अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या काळात भारताला ६३ अब्ज डॉलर मूल्याचे थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळाले, असे हा अहवाल म्हणतो.या अहवालानुसार २0१५ मध्ये भांडवली गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत प्रथम क्रमांकावर राहिला. त्यामुळे या काळात ६३ अब्ज डॉलरच्या प्रकल्पाच्या गुंतवणुकीची घोषणा झाली. या काळात प्रकल्पांची संख्याही आठ टक्क्यांनी वाढून ६९७ झाली. गुंतवणुकीच्या बाबतीत भारताने आता चीनचे स्थान घेतले आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार २0१५ या वर्षात भारतात ६३ अब्ज डॉलरच्या, अमेरिकेत ५.६ अब्ज डॉलरच्या आणि चीनमध्ये ५६.६ अब्ज डॉलरच्या थेट विदेशी गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली. केंद्रीय वित्तमंत्री जयंत सिन्हा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.
एफडीआयमध्ये भारताने चीनला पछाडले
By admin | Published: April 23, 2016 3:16 AM