वॉशिंग्टन : जागतिक आर्थिक अनिश्चितता सुरूच असल्यामुळे भारताने अमेरिकी सरकारच्या रोख्यांमधील गुंतवणूक घटवून ११५.६ अब्ज डॉलर केली आहे.
गेल्या महिन्यापर्यंत सलग आठ महिने भारताची अमेरिकी रोख्यांतील गुंतवणूक वाढत होती. त्यानंतर जुलै व आॅगस्टमध्ये ही गुंतवणूक भारताने कमी केली. अमेरिकेच्या रोख्यांमध्ये भारताची गुंतवणूक जुलैमध्ये ११६.४ अब्ज डॉलरवरून ११५.६ अब्ज डॉलरवर आली आहे. अमेरिकी रोख्यांत चीनची गुंतवणूक सर्वाधिक १,२७१ अब्ज डॉलर आहे. जपानने १,१९७ अब्ज डॉलरचे अमेरिकी रोखे खरेदी केले आहेत. ब्रिक्स देशांच्या समूहातील ब्राझीलनेही अमेरिकी रोख्यांमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकी रोख्यांतील गुंतवणूक भारताने घटविली
जागतिक आर्थिक अनिश्चितता सुरूच असल्यामुळे भारताने अमेरिकी सरकारच्या रोख्यांमधील गुंतवणूक घटवून ११५.६ अब्ज डॉलर केली आहे.
By admin | Published: October 23, 2015 02:40 AM2015-10-23T02:40:27+5:302015-10-23T02:40:27+5:30