Join us  

भारतातर्फे नेपाळला एक अब्ज रुपये

By admin | Published: January 10, 2017 12:48 AM

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया नेपाळ राष्ट्र बँकेला (एनआरबी) एक अब्ज रुपये उपलब्ध करून देण्यास तयार आहे.

काठमांडू : रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया नेपाळ राष्ट्र बँकेला (एनआरबी) एक अब्ज रुपये उपलब्ध करून देण्यास तयार आहे. भारताने ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नेपाळने आमच्याकडे १०० रुपये मूल्यांच्या नोटांची टंचाई झाल्याचे भारताला सांगितले होते. चलन रद्द झाल्यानंतरची परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत वाट पाहा, असे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने नेपाळला सांगितले होते. एक अब्ज रुपये भारताकडून जानेवारी महिन्यात आणण्याची तयारी आम्ही करीत आहोत, असे एनआरबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताने उच्च मूल्यांच्या नोटा रद्द केल्यानंतर नेपाळ राष्ट्र बँकेने नेपाळमध्ये भारतीय चलनी नोटा बदलून देण्याची मर्यादाही खाली आणली आहे. सध्या नेपाळमध्ये नागरिकत्वाची ओळख पटवून दोन हजार रुपये बदलून दिले जातात. शिवाय जे भारतात रेल्वेने किंवा विमानाने प्रवास केल्याची तिकिटे दाखवतील त्यांना १० हजार रुपये तर वैद्यकीय कारणांसाठी भारतात प्रवास केलेल्यांना २५ हजार रुपये बदलून दिले जात आहेत. परंतु या वर्षी ५०० व हजारच्या नोटा रद्द झाल्यामुळे तशी सोय मिळण्याची शक्यता नाही, असे अधिकारी म्हणाले. (वृत्तसंस्था)दरवर्षी दिली जाते रक्कमरिझर्व्ह बँक आॅफ इंडिया नियमितपणे चलन बदलून देण्याची सोय करीत नाही तोपर्यंत भारतीय चलन बदलून देण्याची मर्यादा वाढवण्याचा विचार आम्ही करणार नाही, असे एनआरबीचे अधिकारी जनक बहादूर अधिकारी यांनी म्हटले.च् आरबीआय नेपाळला भारतीय आर्थिक वर्षानुसार दरवर्षी ६ अब्ज रुपये बदलून देण्याची सोय करीत असतो.