Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगात भारतच ‘स्टार परफॉर्मर’! जगाच्या विकासात १६ टक्के योगदान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रशस्ती

जगात भारतच ‘स्टार परफॉर्मर’! जगाच्या विकासात १६ टक्के योगदान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रशस्ती

भारताची सेवा निर्यात गेल्या दशकभरातील उच्चांकी पातळीवर पाेहाेचली आहे. त्यामुळे शुद्ध निर्यात वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 06:37 AM2023-12-20T06:37:55+5:302023-12-20T06:38:10+5:30

भारताची सेवा निर्यात गेल्या दशकभरातील उच्चांकी पातळीवर पाेहाेचली आहे. त्यामुळे शुद्ध निर्यात वाढली आहे.

India is the 'star performer' in the world! 16 percent contribution to world development, praise of International Monetary Fund | जगात भारतच ‘स्टार परफॉर्मर’! जगाच्या विकासात १६ टक्के योगदान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रशस्ती

जगात भारतच ‘स्टार परफॉर्मर’! जगाच्या विकासात १६ टक्के योगदान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रशस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) निकषानुसार भारत आर्थिक आघाडीवर ‘स्टार परफॉर्मर’ म्हणजेच सर्वोत्तम कामगिरी करणारा देश ठरला आहे. जागतिक वृद्धीमध्ये भारताचे योगदान तब्बल १६ टक्के राहिले आहे, असे आयएमएफने म्हटले आहे. 

‘आयएमएफ’च्या भारतातील मिशनच्या प्रमुख नाडा चौइरी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अलीकडील काही वर्षांत भारताचा वृद्धीदर मजबूत असल्याचे दिसून येत आहे.  डिजिटीकरण आणि पायाभूत सुविधांसारख्या प्रमुख क्षेत्रांत आर्थिक सुधारणा राबविल्यामुळे भारताचा वृद्धीदर मजबूत झाला आहे. अन्य देशांशी तुलना केल्यास भारत एक स्टार परफॉर्मर ठरला आहे. आमच्या विद्यमान अंदाजानुसार, भारत यंदा जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीमध्ये १६ टक्के योगदान देत आहे. तो जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे. 

आयएमफएफच्या अहवालात काय आहे?
nभारतीय अर्थव्यवस्था कोविड-१९ साथीच्या धक्क्यातून सावरली आहे. महागाई कमी झाली आहे. 
nरोजगार कोविडपूर्व पातळीच्या वर गेला आहे. अनौपचारिक क्षेत्राचा दबदबा कायम आहे.
nऔपचारिक क्षेत्रात प्रगती दिसून आली आहे. अर्थसंकल्पीय तूट कमी झाली आहे.
nसार्वजनिक कर्ज उच्च पातळीवर आहे, असे आयएफएफच्या अहवालात म्हटले आहे.

सेवा निर्यातीचा उच्चांक

भारताची सेवा निर्यात गेल्या दशकभरातील उच्चांकी पातळीवर पाेहाेचली आहे. त्यामुळे शुद्ध निर्यात वाढली आहे. जगभरातील मागणी भारत पूर्ण करताेय. त्याचवेळी देशांतर्गत मागणीलाही हताळण्यात येत आहे. 

परदेशातून अनिवासी भारतीयांनी पाठविले १२५ अब्ज डॉलर 

 २०२३ मध्ये अनिवासी नागरिकांकडून पैसे प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताने जगातील आपले सर्वोच्च स्थान काय ठेवले आहे. विदेशात काम करणाऱ्या भारतीयांनी १२५ अब्ज डॉलर स्वदेशी पाठविले आहेत. जागतिक बँकेच्या ‘स्थलांतर आणि विकास सार’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
६९९ अब्ज डाॅलर उच्च-मध्यम व उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अनिवासी नागरिकांनी पाठविले आहेत.
७.२ टक्के वाढ दक्षिण आशियात पाठविण्यात आलेल्या पैशात झाली आहे. त्यात भारताचा वाटा सर्वाधिक आहे.
३.८ टक्क्यांनी ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे.
१.४ टक्के घट युराेप व मध्य आशियामध्ये झाली आहे.
२०० डाॅलर सरासरी पाठवण्याचे प्रमाण जास्त.

Web Title: India is the 'star performer' in the world! 16 percent contribution to world development, praise of International Monetary Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत