Join us

भारत जागतिक अर्थव्यवस्थेचे शक्तिकेंद्र बनण्याची शक्यता

By admin | Published: November 12, 2015 11:50 PM

भारत २०२० च्या दशकामध्ये जागतिक आर्थिक विकासाच्या दृष्टीने चीनसारखे शक्तिशाली केंद्र बनू शकते. परंतु त्यासाठी देशात आवश्यक असलेला पायाभूत सुविधांचा अभाव

नवी दिल्ली : भारत २०२० च्या दशकामध्ये जागतिक आर्थिक विकासाच्या दृष्टीने चीनसारखे शक्तिशाली केंद्र बनू शकते. परंतु त्यासाठी देशात आवश्यक असलेला पायाभूत सुविधांचा अभाव आणि महिला-पुरुष भेदभाव यांसह अनेक समस्यांवर तोडगा काढावा लागेल, असे मत इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट (ईआययू)ने म्हटले आहे.ईआययूचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ सिमोन बाप्तिस्त म्हणाले, ‘चीनने २००० च्या दशकामध्ये ज्याप्रमाणे जगाला बदलले होते, अगदी त्याचप्रमाणे २०२० च्या दशकात जगाला बदलण्याची संभावित क्षमता असलेला भारत हा एकमेव देश आहे. भारताला वास्तविक उड्डाण करण्यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु भारत २०२० मध्ये जागतिक विकासाचे एक प्रमुख केंद्र बनणार, हे मात्र निश्चित आहे.’आपल्या न्यूजलेटरमध्ये बाप्तिस्त पुढे म्हणतात, ‘यामागे सरकारचे महत्त्वाकांक्षीय मेक इन इंडिया अभियान आहे. या माध्यमातून देशाचे बांधकाम केंद्रात पविर्तन करायचे आहे. परंतु चीनप्रमाणे बांधकाम क्षेत्रात उड्डाण करण्याची पूर्वअट मात्र अद्याप भारताकडे विद्यमान नाही.’ ईआययूच्या एबीबीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘भारताच्या विकासाच्या संभावनांचे द्वार उघडण्यासाठी कशाची गरज आहे?’ या मथळ्याअंतर्गत आपल्या विशेष वृत्तांतात बाप्तिस्त यांनी वरील मत व्यक्त केले आहे. एबीबी ही वीज आणि स्वचलित तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे.‘चीनमध्ये २००१ मध्ये जेव्हा बांधकाम क्षेत्र विश्वव्यापी बनले होते, जेथे कौशल्य आणि शिक्षणाचा दर्जा उंचावला होता, त्या मानाने भारत फार मागे आहे. भारतात स्त्री-पुरुष भेदभाव फार जास्त आहे. शिक्षण क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. परंतु रोजगाराच्या बाबतीत हे अंतर जास्त आहे. वीज टंचाई आणि शहरीकरणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा हे प्रमुख आव्हान आहे. पण भारताच्या बाजूने एक सकारात्मक पक्ष आहे, जो त्यावेळी चीनमध्येही होता. तो आहे मोठ्या बाजारपेठेसह निर्यात क्षेत्रातसाठी बांधकामाचा आधार,’ असेही बाप्तिस्त यांनी नमूद केले आहे. (वृत्तसंस्था)