Join us  

'देश आधी, व्यवसाय नंतर', उड्डाणे रद्द... या भारतीय ट्रॅव्हल कंपनीचा मालदीवला झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 8:35 PM

India Maldives row: मालदीवच्या मंत्र्यांनी PM मोदी आणि भारताबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मालदीवला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

India Maldives row: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप (Lakshdweep) दौऱ्यानंतर सुरू झालेल्या भारत-मालदीव वादाचे (India Maldives row) पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या वादामुळे भारतीय पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या मालदीवला (Maldives) मोठा आर्थिक फटका बसतोय. अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी मालदीवचे बुकिंग्स रद्द केले आहेत. याच क्रमात भारतीय कंपनी EaseMy Trip ची नवीन जाहिरात आणि टॅगलाईन चर्चेत आहे. 

'आमच्यासाठी नफ्याच्या आधी देश येतो'कंपनीने आपल्या नवीन जाहिरातीत 'देश आधी, व्यवसाय नंतर' असे स्पष्ट संदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, हा वाद सुरू याच कंपनीने सर्वप्रथम मालदीवचे सर्व बुकिंग रद्द केले होते. EaseMy Trip ने याबाबत म्हटले की, आम्ही आमच्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी वचनबद्ध आहोत. भारत, भारतातील नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या अनेक मंत्र्यांच्या टिप्पण्यांवर आम्ही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 8 जानेवारीपासून आम्ही मालदीवमधील सर्व प्रवासी बुकिंग अनिश्चित काळासाठी निलंबित केल्या असून, आमच्यासाठी आमचा देश नफ्याच्या आधी येतो.

जनतेला एकजूट राहण्याचे आवाहनकंपनीने भारतातील पर्यटन स्थळांचा उल्लेख करताना म्हटले की, आम्हाला भारतातील अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा खूप अभिमान आहे. आपल्या देशाला 7500 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलाय, ज्यात अंदमान, गोवा, केरळ आणि लक्षद्वीपचाही समावेश आहे. सोशल मीडियावरील तुमचा पाठिंबा हे राष्ट्राप्रती असलेल्या आमच्या प्रेमाचे उदाहरण आहे, या प्रवासात आपण एकजूट राहू या… जय हिंद.

लक्षद्वीपसाठी मोठी सवलतभारत-मालदीव वादात सोशल मीडियावर #BycottMaldives आणि #Chalolakshdweep ट्रेंड करत आहेत. यामुळे टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांचेही लक्षद्वीपकडे लक्ष वळले आहे. यामुळेच कंपन्या लक्षद्वीप दौऱ्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत. EaseMyTrip ने बुधवारी आपल्या ग्राहकांसाठी NATIONFIRST आणि BHARATFIRST डिस्काउंट कोडची घोषणा केली आहे. या कोड्सद्वारे दिल्ली ते बंगळुरू, मुंबई फ्लाइटसाठी 600 ते 700 रुपयांची सूट उपलब्ध आहे. 

ट्रॅव्हल कंपनीचे शेअर्स वधारलेदरम्यान, भारताप्रती असलेल्या या समर्पणाच्या भावनेचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून येतोय. या निर्णयानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. गुरुवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळातच EaseMy Trip च्या शेअर्सने 16 टक्क्यांनी उसळी घेतली. अवघ्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स 24 टक्क्यांनी वधारले आहेत.

(टीप- शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :भारतमालदीवनरेंद्र मोदीव्यवसायसोशल मीडिया