जिनेव्हा : जगभरात रोजगाराची स्थिती गंभीर राहण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) दिला असून, भारताने कामगारांच्या क्षेत्रात महिलांची भागीदारी वाढविण्याच्या गरजेवर भर दिला आहे.
आयएलओचे प्रमुख (संशोधन विभाग) रेमंड टोरेस यांनी ‘नवीन जागतिक बेरोजगारी अहवाल’ जारी केला. हा अहवाल जारी करताना ते म्हणाले की, भारताने आपल्या प्रमुख रोजगार योजना आणखी मजबूत करणे आवश्यक आहे, तसेच काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक निवासस्थाने उपलब्ध करून आणले पाहिजे.
भारतात श्रम वर्गात महिलांची कमी भागीदारी हा चिंतेचा विषय आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी वाढविणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण रोजगार हमी योजनेचा अनुभव पाहता ही योजना आणखी चांगली करण्याची आवश्यकता आहे. या योजनेवरून भारतात चर्चा सुरू असली तरीही ही योजना बंद करणे चुकीचे ठरेल. हा एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम आहे, असेही ते म्हणाले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, सामाजिक निवासस्थानांवर भर देणे हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषत: गरीब कामगार महिलांना ही घरे उपलब्ध झाली पाहिजेत.
या अहवालानुसार जागतिक स्तरावर बेरोजगारीचे आकडे आश्चर्यकारक आहेत. २०१५ मध्ये जागतिक बेरोजगारी १९.७१ कोटी होती. २००७ साली आलेल्या मंदीच्या तुलनेत हा आकडा २.७० कोटींनी अधिक आहे. २०१६ मध्ये त्यात २३ लाखांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती १९.७४ कोटींपर्यंत जाईल. वर्ष २०१७ मध्ये त्यात आणखी ११ लाखांची भर पडेल.
आयएलओ महासंचालक गाय रायडर म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या फार संधी उपलब्ध करीत नाही.
‘भारताने कामगार क्षेत्रात महिलांची भागीदारी वाढविण्याची गरज’
जगभरात रोजगाराची स्थिती गंभीर राहण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) दिला असून, भारताने कामगारांच्या क्षेत्रात महिलांची भागीदारी वाढविण्याच्या गरजेवर भर दिला आहे.
By admin | Published: January 21, 2016 03:11 AM2016-01-21T03:11:31+5:302016-01-21T03:11:31+5:30