Lokmat Money > बिझनेस न्यूज > “१० हजार अंबानी, २० हजार अदानी घडतील तेव्हाच भारत विकसित होईल”

“१० हजार अंबानी, २० हजार अदानी घडतील तेव्हाच भारत विकसित होईल”

G20 शेरपा अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 02:14 PM2022-11-09T14:14:15+5:302022-11-09T14:14:47+5:30

G20 शेरपा अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा.

india needs ten thousand ambani and twenty thousand adani to become more powerful says amitabh kant das | “१० हजार अंबानी, २० हजार अदानी घडतील तेव्हाच भारत विकसित होईल”

“१० हजार अंबानी, २० हजार अदानी घडतील तेव्हाच भारत विकसित होईल”

१ डिसेंबरपासून भारत G20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 8 नोव्हेंबर (G-20) रोजी पुढील वर्षीच्या बैठकीचा लोगो, थीम आणि वेबसाइट (G-20 India Logo, Theme and Website) जारी केली. पंतप्रधान मोदींनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या या कार्यक्रमाचे वर्णन केले आणि ते 130 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याचे, तसेच क्षमतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्याचवेळी G20 शेरपा अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा आहे.

“आम्हाला एक अंबानी आणि एक अदानी नाही तर 10,000 अंबानी आणि 20,000 अदानी हवे आहेत, तरच भारताचा विकास होईल. यासाठी आपल्याला G20 च्या संधींचा उपयोग आपापल्या क्षेत्रात आणखी मोठे होण्यासाठी केला पाहिे. अशी संधी आपल्याला परत मिळणार नाही,” असं अमिताभ कांत म्हणाले.

या देशांचं नेतृत्व करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी इंडोनेशियात होणाऱ्या जी 20 बैठकीत सहभागी होणार आहेत. तर डिसेंबरमध्ये भारत जी 20 चं नेतृत्व करणार आहे. जी 20 मध्ये ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, रशिया, अमेरिकेसह अन्य देशांचा सहभाग आहे. 2023 मध्ये जी 20 चं आयोजन भारतात केलं जाणार आहे. हे यशस्वी करण्यासाठी सरकारनं आतापासूनच प्रयत्न करत आहेत.

काय असतात जी 20 शेरपा?
जी 20 सारख्या कार्यक्रमाचं आयोजन भारतात होणार आहे. यासाठी अमिताभ कांत यांना शेरपाची जबाबदाकी सोपवण्यात आली आहे. देशांतर्गत सर्व एजन्सी आणि परदेशी एजन्सींदरम्यान सामंजस्य ठेवण्याचं काम शेरपाचं असतं.

 

Web Title: india needs ten thousand ambani and twenty thousand adani to become more powerful says amitabh kant das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.