Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनला मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर! 'ड्रॅगन'ला का सोडतायत फॉक्सकॉन, टेस्ला अन् अ‍ॅपल?

चीनला मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर! 'ड्रॅगन'ला का सोडतायत फॉक्सकॉन, टेस्ला अन् अ‍ॅपल?

यामध्ये भारताचे स्थान पहिल्या क्रमांकावर आले आहे. अ‍ॅप्पल, नंतर फॉक्सकॉन आणि आता टेस्लादेखील भारतात येण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 09:03 PM2023-11-30T21:03:22+5:302023-11-30T21:04:39+5:30

यामध्ये भारताचे स्थान पहिल्या क्रमांकावर आले आहे. अ‍ॅप्पल, नंतर फॉक्सकॉन आणि आता टेस्लादेखील भारतात येण्याच्या तयारीत आहे.

India overtakes China in the first place Why are Foxconn, Tesla and Apple leaving Dragon | चीनला मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर! 'ड्रॅगन'ला का सोडतायत फॉक्सकॉन, टेस्ला अन् अ‍ॅपल?

चीनला मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर! 'ड्रॅगन'ला का सोडतायत फॉक्सकॉन, टेस्ला अन् अ‍ॅपल?

एक काळ होता, चीनकडे जगाची फॅक्ट्री म्हणून पाहिले जात होते. मात्र, कोरोना महामारीनंतर चीनला आर्थिक पातळीवळ बरेच धक्के बसले. येथील कंपन्या बंद होऊ लागल्या. चीन सरकारच्या कोविड विषयक धोरणाचा जगातील अनेक कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला. यानंतर, अमेरिका आणि युरोपातील कंपन्यांनी चीनचा दुसरा पर्याय म्हणून इतर देशांसोबत संपर्क साधायायला सुरुवात केली. यामध्ये भारताचे स्थान पहिल्या क्रमांकावर आले आहे. अ‍ॅपल, नंतर फॉक्सकॉन आणि आता टेस्लादेखीलभारतात येण्याच्या तयारीत आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, भारतातील मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. यात भारत चीनला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. याच बरोबर व्हिएतनामही चीनला टक्कर देण्यात आघाडीवर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्स यासंदर्भात ट्विट केले आहे. यात 50 देशांची यादी जारी करण्यात आली आहे. ही यादी यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टच्या हवाल्याने तयार करण्यात आली आहे. यातील टॉप टेन देशांसंदर्भात बोलायचे झाल्यास, भारत आणि चीन शिवाय यात बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया कंबोडिया, इंडोनेशिया सारख्या देशांची नावं आहेत.

भारतानं चीनला मागे टाकलं -
जगभरातील कंपन्या ज्या पद्धतीने चीनमधून बाहेर पडत, इतर देशांमध्ये जात आहेत. यावरून त्यांचा तेथे भ्रमनिरास होत असल्याचे स्पष्ट होते. तसेच, दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, या बड्या कंपन्यांना चीनमध्ये वाढलेल्या उत्पादन खर्चाचाही सामना करावा लागत आहे. या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. याचाच अर्थ, भारताचा उत्पादन खर्च जगात सर्वात कमी आहे. याच कारणामुळे अ‍ॅप्पलसारख्या एका मोठ्या कंपनीने भारताला आपले दुसरे घर बनवले आहे. हळूहळू का होईना, पण ही कंपनी चीनमधून भारतात शिफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे.

हे देशही टॉप टेनमध्ये - 
या यादीतील टॉप 10 देशासंदर्भात बोलायचे झाल्यास, थायलंड चौथ्या, फिलिपिन्स 5 व्या, बांगलादेश सहाव्या, इंडोनेशिया सातव्या, कंबोडिया 8 व्या, मलेशिया 9 व्या, तर श्रीलंका 10 क्रमांकावर आहे. या देशांमध्येही उत्पादन खर्च सर्वात कमी लागतो. या शिवाय या यादीत, घाना, केनिया, मेक्सिको, उझबेकिस्तान, कोलंबिया, दक्षिण आफ्रिका, कझाकिस्तान, ट्युनिशिया, चिली, अल्जेरिया, तुर्की, उरुग्वे, पनामा, सिंगापूर, ब्राझील, इजिप्त, दक्षिण कोरिया, इराण, लिथुआनिया, सर्बिया आणि बेलारूस, आदी देशांचाही या यादीत समावेश आहे. 

Web Title: India overtakes China in the first place Why are Foxconn, Tesla and Apple leaving Dragon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.