Join us

टोकाचं शत्रुत्व, राजकीय संबंधात तणाव, तरीही पाकिस्तानमधून या १० गोष्टी मागवतो भारत, घराघरात होतो वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 10:39 AM

India-Pakistan Trade: अशा काही वस्तूंचं उत्पादन पाकिस्तानात होतं, ज्या भारत पाकिस्तानमधून मागवतो. देशातील घराघरांमध्ये या वस्तूंचा वापर होतो. आज आपण जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या भारतात कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानमधून मागवल्या जातात.

गेल्या काही काळापासून पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तेथील परिस्थिती सुधरण्याचं नाव घेत नाही आहे. महागाईने कळस गाठला आहे. भूक भागवण्यासाठी लोकांकडून लुटालूट केली जात आहे. पाकिस्तानमधील ही स्थिती भारतासाठीही चिंतेची बाब ठरत आहे. अशा काही वस्तूंचं उत्पादन पाकिस्तानात होतं ज्या भारत पाकिस्तानमधून मागवतो. देशातील घराघरांमध्ये या वस्तूंचा वापर होतो. आज आपण जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या भारतात कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानमधून मागवल्या जातात.

पाकिस्तानमधून भारतात अनेक गोष्टींची आयात होते. यामध्ये ताजी फळे, सिमेंट आणि चामड्याच्या वस्तूंपासून ते मिठापर्यंतचा समावेश आहे. पाकिस्तानमधून सौंदर्यप्रसाधनामध्ये वापरली जाणारी मुलतानी मातीही भारतात मोठ्या प्रमाणात आयात होते. पाकिस्तानमधून येणारी फळे काश्मीरच्या वाटेने दिल्लीच्या मार्केटपर्यंत पोहोचतात. 

ड्रायफ्रूट्स, टरबूज आणि इतर फळांबरोबरच पाकिस्तानमधून भारतात सेंधव मिठाचीही मोठ्या प्रमाणात आयात होते. सेंधव मीठाचा वापर हा व्रतवैकल्यांदरम्यान केला जातो. सेंधव मिठाचं बहुतांश उत्पादन हे पाकिस्तानमध्येच होतं. त्यामुळे भारत पाकिस्तानमधूनच त्याची आयात करतो. भारतामध्ये बिनानी सिमेंटलाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र त्याचं उत्पादनही पाकिस्तानात होतं. पाकिस्तानमधील सल्फर आणि चुनासुद्धा भारतात मोठ्या प्रमाणावर विकला जातो. त्याशिवाय चष्म्यामध्ये वापरले जाणारे ऑप्टिकल्ससुद्धा मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमधून मागवले जातात. काही वैद्यकीय उपकरणेसुद्धा भारत शेजारील देशाकडून मागवतो. भारत पाकिस्तानमधून चामड्याचं सामानही मोठ्या प्रमाणात आयात करतो. 

पाकिस्तानमधून भारतात आयात होणाऱ्या १० प्रमुख वस्तू पुढीलप्रमाणे आहेत. फळे, सिमेंट, सेंधव मीठ, दगड, चुना, चष्म्यांचे ऑप्टिकल्स, कॉटन, स्टिल, कार्बनिक केमिकल्स आणि मेटल कंपाऊंड, चामड्याच्या वस्तू.  

टॅग्स :व्यवसायभारतपाकिस्तान