Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' तीन योजनांत गुंतवलेला पैसा कमी कालावधीत होतो दुप्पट, जाणून घ्या

'या' तीन योजनांत गुंतवलेला पैसा कमी कालावधीत होतो दुप्पट, जाणून घ्या

सध्या आपण गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग शोधत असल्यास अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 08:19 PM2019-05-16T20:19:08+5:302019-05-16T20:20:10+5:30

सध्या आपण गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग शोधत असल्यास अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

india post office schemes giving handsome return on long term investment | 'या' तीन योजनांत गुंतवलेला पैसा कमी कालावधीत होतो दुप्पट, जाणून घ्या

'या' तीन योजनांत गुंतवलेला पैसा कमी कालावधीत होतो दुप्पट, जाणून घ्या

नवी दिल्लीः सध्या आपण गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग शोधत असल्यास अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कुठे गुंतवणूक करायची हे आपल्यावर निर्भर आहे. गुंतवणुकीत जास्त जोखीम उचललल्यास जास्त फायदा मिळतो. सुरक्षित गुंतवणुकीसाठीही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचे चांगले पर्यायांची माहिती देणार आहोत.  
बँक फिक्स्ड डिपॉझिट(FD)
जर आपल्याला सुरक्षित गुंतवणूक करायची असल्यास एफडी चांगला पर्याय आहे. बँक फिक्स्ड डिपॉझिट(FD)मध्ये पैसे गुंतवल्यास 12 वर्षांत दुप्पट फायदा मिळवूत देतात. SBIच्या 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6 टक्के व्याज मिळतं. या योजनेत गुंतवलेले 1 लाख रुपये 12 वर्षांनंतर दोन लाख होतात. 
पोस्ट ऑफिस (FD)
पोस्ट ऑफिसच्या योजनेत पैसा लवकर दुप्पट होतो. इथे 10 वर्षांत पैसे दुप्पट होतात. पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिटचा पर्याय आहे. पाच वर्षांनंतर पुन्हा त्या योजनेत पैसे गुंतवता येतात. 10 वर्षांनी दुप्पटहून अधिक परतावा मिळतो.   


किसान विकास पत्र
पोस्टातल्या किसान विकास पत्रमध्येही 115 महिन्यांसाठी (9 वर्षं आणि 7 महिन्यांत दुप्पट) पैसे गुंतवल्यास दुप्पट होतात. पोस्टातल्या किसान विकास पत्रमध्ये 1000, 5000, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते. या योजनेत गुंतवलेल्या पैशांची कोणतीही मर्यादा नसते. अडीच लाखांहून अधिकची रक्कम गरज पडल्यास काढता येते.   
 

Web Title: india post office schemes giving handsome return on long term investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.