Join us

घरबसल्या पैसे काढणं आणि जमा करणं होणार आणखी सोपं; 'ही' बँक देते मोफत असंख्य सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 5:39 PM

IPPB has waived the Doorstep Banking Charges : आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते ज्यात आर्थिक सेवांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - डोअर स्टेप बँकिंगबद्दल आता अनेकांनी माहीत आहे. यामध्ये बँक आपल्या घरी येते आणि आपल्याला मर्यादित आर्थिक आणि विविध प्रकारच्या आर्थिक सुविधा पुरवते. त्यासंदर्भात काही अटी आणि शर्थी देखील आहेत. जर आपले पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने डोअर स्टेप बँकिंग शुल्क (IPPB has waived the Doorstep Banking Charges) माफ केलं आहे. 

डोअरस्टेप बँकिंग अंतर्गत पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते ज्यात आर्थिक सेवांचा समावेश आहे. जर तुम्हाला बँक खातं उघडायचे असेल तर टपाल कार्यालयाचा प्रतिनिधी तुमच्या घरी येईल आणि खाते उघडले जाईल. याव्यतिरिक्त, रोख पैसे काढणे आणि ठेवणे देखील शक्य आहे. मनी ट्रान्सफरदेखील कोणत्याही अडचणीशिवाय करता येतं. याशिवाय डीटीएच रिचार्ज, वीज आणि पाण्याचं बिल देखील भरता येतं.

पॅन, नॉमिनी अपडेट करता येतं

डोअर स्टेप बँकिंग अंतर्गत इतर अनेक खात्याशी संबंधित सेवा देखील उपलब्ध आहेत. खात्यासह पॅन कार्ड अपडेट करणं, नॉमिनी अपडेटेशन, अकाऊंट स्टेटमेंटसाठी विनंती दाखल करणं आणि क्यूआर कार्ड जारी करणं यांसारख्या सर्व सुविधांचा समावेश आहे. याशिवाय आधार आधारित पेमेंट सिस्टम अंतर्गत रोख रक्कम काढणे, शिल्लक तपासणे आणि मिनी स्टेटमेंट काढणे पूर्णतः विनामूल्य आहे. या सर्व सुविधांव्यतिरिक्त विमा, कर्ज, गुंतवणुकीची सुविधादेखील पुरवली जात आहे.

कशी करावी बुक सर्व्हिस?

तुम्हालाही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या डोअर स्टेप बँकिंग सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास 155299 वर कॉल करा. येथे स्वत: साठी अपॉईंटमेंट बुक करा. एसएमएसच्या सहाय्याने कन्फर्म करा. त्यानंतर त्याचा प्रतिनिधी पोस्ट ऑफिसमधून आपल्या घरी येईल. आपल्याला आपला खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर सांगावा लागेल, त्यानंतर पुढील सेवा मिळू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Savings Account चा वापर करत नसाल तर लगेचच करा बंद नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

एकापेक्षा अधिक बँकांमध्ये तुमचं जर सेव्हिंग अकाऊंट (Saving Account) असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही एखाद्या बँकेत खातं उघडले असेल आणि त्याचा वापर तुम्ही करत नसाल तर ते खातं लगेचच बंद करणं गरजेचं आहे. अर्थिक सल्लागारांच्या मते, वापरात नसलेलं बँक खातं (Bank Account) बंद करणं हे केव्हाही फायदेशीर आहे. गरजेपेक्षा जास्त बँक खाती असल्यास ही बाब नुकसानदायी ठरते. आपण जेव्हा नोकरी बदलतो किंवा नोकरीसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो अशावेळी अन्य गरजांमुळे सेव्हिंग अकाऊंटसची संख्या वाढते. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक सेव्हिंग अकाउंट्स असतील तर ते नुकसानदायी ठरु शकतं. 

टॅग्स :बँकपैसा