Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्ट ऑफिसच्या IPPB अ‍ॅपद्वारे बचत खाते कसे उघडायचे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

पोस्ट ऑफिसच्या IPPB अ‍ॅपद्वारे बचत खाते कसे उघडायचे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Post Office Banking : आयपीपीबी या मोबाईल अ‍ॅपद्वारे तुम्ही सहज डिजिटल बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) उघडू शकता. हे खाते उघडून पैशाचे ऑनलाइन व्यवहार सहज करता येऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:14 PM2022-03-23T17:14:50+5:302022-03-23T17:16:50+5:30

Post Office Banking : आयपीपीबी या मोबाईल अ‍ॅपद्वारे तुम्ही सहज डिजिटल बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) उघडू शकता. हे खाते उघडून पैशाचे ऑनलाइन व्यवहार सहज करता येऊ शकतात.

india post payments bank ippb app follow this process to open digital saving bank account know details | पोस्ट ऑफिसच्या IPPB अ‍ॅपद्वारे बचत खाते कसे उघडायचे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

पोस्ट ऑफिसच्या IPPB अ‍ॅपद्वारे बचत खाते कसे उघडायचे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

नवी दिल्ली : बदलत्या काळानुसार बँकिंग व्यवहारात बरेच बदल झाले आहेत. आता जवळपास सर्व बँकांमध्ये सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. पोस्ट ऑफिसनेही ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन आपल्या अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. यासाठी पोस्ट ऑफिसने इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आयपीपीबी (IPPB) अ‍ॅपही सुरू केले आहे. 

आयपीपीबी या मोबाईल अ‍ॅपद्वारे तुम्ही सहज डिजिटल बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) उघडू शकता. हे खाते उघडून पैशाचे ऑनलाइन व्यवहार सहज करता येऊ शकतात. या अ‍ॅपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता तुम्हाला पोस्ट ऑफिसशी संबंधित काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रांगेत उभे राहावे लागणार नाही. तुम्ही तुमचे काम घरी बसून सहज करू शकता. तुम्हालाही आयपीपीबी अ‍ॅपवर बचत खाते उघडायचे असेल, तर खाली देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा. 

डिजिटल खाते सुरू करण्याचे नियम... 
- डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- हे खाते उघडल्यानंतर केवायसी प्रक्रिया १२ महिन्यांत पूर्ण करा.
- या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करू शकता.
- हे डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिस डिजिटल बचत खात्याचे फायदे...
- या बँक खात्याद्वारे तुम्ही नेट बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता.
- याच्या मदतीने तुम्ही दुसऱ्याच्या खात्यात पैशांचे व्यवहार सहज करू शकता.
- याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता.
- या खात्याद्वारे पोस्ट ऑफिस आरडी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

पोस्ट ऑफिस डिजिटल बचत खाते उघडण्याची पद्धत...
- पोस्ट ऑफिस डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी, प्रथम तुमच्या स्मार्टफोनवर IPPB अॅप डाउनलोड करा.
- यानंतर Open Account या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन क्रमांकाची माहिती विचारली जाईल. भरा.
- आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो तुम्ही नमूद करा.
- त्यानंतर पालकांचे नाव, पत्ता इत्यादी वैयक्तिक तपशील भरा.
- सर्व माहिती दिल्यानंतर तुमचे खाते उघडले जाईल.
- केवायसी प्रक्रिया एका वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे.
- केवायसी प्रक्रियेनंतर, हे खाते पोस्ट ऑफिसच्या नियमित बचत खात्यात रूपांतरित केले जाईल.

Web Title: india post payments bank ippb app follow this process to open digital saving bank account know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.