नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी भारतातल्या पोस्ट पेमेंट्स बँकेचं उद्घाटन केलं. 1 सप्टेंबरपासून भारतातल्या 650 शाखांमध्ये काम सुरू करण्यात आलं आहे. पोस्टाकडून सुरू करण्यात आलेली ही पहिली पेमेंट्स बँक नव्हे, तर एअरटेल, पेटीएम आणि आयडियानंही पेमेंट्स बँक ग्राहकांना आधीच उपलब्ध करून दिल्या आहेत. या पेमेंट्स बँकेच्या तुलनेत पोस्टाची पेमेंट्स बँक किती फायदेशीर आहे, याची माहिती आम्ही देणार आहोत.
- बचत खात्यावरील व्याज
बचत खात्यावर चांगलं व्याज देण्यात भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक सर्वात पुढे आहे. पोस्ट पेमेंट्स बँक तुम्हाला बचत खात्यावर 5.5 टक्के व्याज देते. तर पेटीएम आणि एअरटेल पेमेंट्स बँक तुमच्या रकमेवर तुम्हाला फक्त 4 टक्के व्याज देतात. आदित्य बिर्ला पेमेंट्स बँक साप्ताहिकरीत्या 4 टक्के व्याज देते आहे.
दररोज 55 रुपये वाचवून काढा 10 लाखांचा विमा, पोस्टाची सुपरहिट योजना
10 रुपये गुंतवा आणि कमवा भरघोस नफा, पोस्टाची जबरदस्त योजना
- मिनिमम बॅलेन्स
या प्रकारात तिन्ही पेमेंट्स बँकेत कोणताही फरक नाही. तुम्हाला पाहिजे त्या बँकेत तुम्ही खातं उघडू शकता. यात तुम्हाला कोणताही मिनिमम बॅलेन्स शेवटची अट नाही. दुसरीकडे एअरटेल, आदित्य बिर्ला आणि पेटीएम तुम्हाला डिजिटल बँकेवर व्याजाचीही सुविधा देते. पोस्ट पेमेंट्स बँकही अशा प्रकारची सुविधा देते.
- नेटवर्क
नेटवर्कच्या बाबतीत पोस्ट ऑफिस सर्वात पुढे आहे. पोस्टाचं जाळं खेडापाड्यांत विस्तारलेलं आहे. 1 सप्टेंबरपासून भारतातल्या 650 शाखांमध्ये काम सुरू करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत पोस्टाच्या सर्वच शाखांमध्ये पेमेंट्स बँकेची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. इतर बँकेचं नेटवर्क हे डिजिटल स्वरूपात आहे.
पोस्टाची नवी योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळणार जबरदस्त नफा
पोस्टाच्या 'या' तीन योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास मिळणार चौपट नफा, जाणून घ्या कसे गुंतवाल पैसे ?
- बँकिंग
बँकिंग क्षेत्रातही पोस्ट पेमेंट्स बँक अग्रेसर आहे. पोस्ट पेमेंट्स बँक तुम्हाला घरपोच बँकिंगची सुविधा देते. एवढंच नव्हे, तर बँकेत खातंही तुम्ही तुमच्या एजंटच्या माध्यमातून उघडू शकता. विशेष म्हणजे या तिन्ही पेमेंट्स बँकांमध्ये वेगवेगळ्या सुविधा दिल्यामुळे त्या त्यांना विशेष बनवतात. त्यामुळेच तुम्ही नियम आणि अटी वाचून कोणत्याही बँकेत पैसे गुंतवा.