Join us  

Indian Railways : होळीला घरी जायचंय, मग तिकिटांची चिंता करू नका, मिळेल कन्फर्म सीट; IRCTC ने सांगितला नवीन मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:25 AM

IRCTC Tatkal Ticket App : रेल्वेने तुमच्यासाठी जबरदस्त सुविधा आणली आहे, ज्यामुळे तुम्हाला क्षणार्धात कन्फर्म तिकीट मिळेल.

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी आहे. सणासुदीचा हंगाम सुरू असल्याने बहुतांश लोक आपल्या घरी किंवा नातेवाईकांच्या घरी जाण्याचा बेत आखत आहेत. मात्र, आगामी होळी सणामुळे गाड्यांमध्ये मोठी गर्दी होते. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळणे अवघड होते. मात्र आता तुम्हाला तिकिटांची चिंता करावी लागणार नाही. रेल्वेने तुमच्यासाठी जबरदस्त सुविधा आणली आहे, ज्यामुळे तुम्हाला क्षणार्धात कन्फर्म तिकीट मिळेल.

दरम्यान, भारतीय रेल्वेने आता तत्काळ तिकिटांसाठी एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही घर बसल्या आरामात लगेच तत्काळ तिकिटे बुक करू शकता. अनेकवेळा असे घडते की, प्रवाशांना अचानक रेल्वे प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होते. मग तत्काळ तिकीट मिळणेही कठीण होते. मात्र रेल्वेच्या या अ‍ॅपमुळे सर्वसामान्यांची सोय होणार आहे. आयआरसीटीच्या प्रीमियम पार्टनरद्वारे 'कन्फर्म तिकीट' (Confirm Ticket) हे अ‍ॅप आणले. या अ‍ॅपद्वारे रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे.

अ‍ॅपद्वारे मिळतील असे फायदे...- रेल्वेने लाँच केलेल्या या अ‍ॅपवर तुम्हाला ट्रेनसाठी तत्काळ कोट्यात उपलब्ध असलेल्या जागांची माहिती मिळते.- याशिवाय, वेगवेगळ्या ट्रेन नंबर टाकून तुम्ही रिकाम्या जागा सहज शोधू शकता.- यासोबतच संबंधित मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमधील उर्वरित तत्काळ तिकिटांची माहिती तुम्हाला घरबसल्या आरामात या अ‍ॅपवर मिळेल.- हे अ‍ॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.- या अ‍ॅपमध्ये तिकीट बुकिंगसाठी मास्टर लिस्ट देखील आहे, जेणेकरून तिकीट बुकिंगसाठी तुमचा वेळ वाया जाणार नाही.

तिकीट बुक करण्याची वेळ!- या अ‍ॅपवर, प्रवासी त्यांच्या सेव्ह डेटाद्वारे सकाळी 10 वाजल्यापासून तत्काळ तिकीट बुक करू शकतात.- यानंतर, येथे तुम्ही या तिकिटाचे ऑनलाइन पेमेंट करू शकाल.- लक्षात ठेवा की, तिकीट बुकिंग केल्यानंतरही तिकीट वेटिंगमध्ये असू शकते.- या अ‍ॅपचे नाव 'कन्फर्म तिकीट' आहे.- तुम्ही हे अ‍ॅप आयआरसीटीसी नेक्स्ट जनरेशन मोबाइल अ‍ॅपवरूनही डाउनलोड करू शकता.

टॅग्स :रेल्वेतिकिटभारतीय रेल्वे