वॉशिंग्टन : ५0 देशांच्या बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी) निर्देशांकात भारताने थोडीशी प्रगती करून ४४ वे स्थान मिळविले असले तरीही या निर्देशांकात भारत अजूनही तळालाच आहे. आणखी प्रगतीसाठी भारताला सुधारणा कराव्या लागतील, असे अमेरिकेतील यूएस चेंबर आॅफ कॉमर्सने म्हटले आहे.
गेल्या वर्षी या निर्देशांकात ४५ देशांचाच समावेश होता. त्यात भारताचे स्थान ४३ वे होते. यंदा भारताने काही गुणांची सुधारणा केली आहे. निर्देशांकाच्या ६ व्या आवृत्तीत भारताचे एकूण गुण २५ टक्क्यांवरून (३५ पैकी ८.७५) ३0 टक्के (४0 पैकी १२.0३) झाल्याचे यूएस चेंबर आॅफ कॉमर्सच्या ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरने म्हटले आहे. या अहवालानुसार, नव्या मापदंडावर भारताची कामगिरी मजबूत राहिली आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर-इम्प्लिमेंटेड इन्व्हेन्शन्सच्या क्षेत्रात बौद्धिक संपदा हक्क मिळविण्याच्या बाबतीत भारताचे प्रयत्नही सकारात्मक आहेत. (वृत्तसंस्था)
>खूप प्रयत्न हवेत
अहवालात म्हटले आहे की, वास्तविक बौद्धिक संपदा हक्कधारकांसाठी अत्यंत आव्हानात्मक वातावरणात भारताने याबाबतीत जाणीव जागृती केल्याचे दिसून येते. भारताचे प्रयत्न वाखाणण्याजोगे असले तरी अजून खूप काही करावे लागणार असल्याचे दिसून येते. विशेषत: आयुर्विज्ञान बौद्धिक संपदा यांसह अनेक क्षेत्रात काम करणे भारताला आवश्यक आहे.
५0 देशांच्या बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत ४४ वा
५0 देशांच्या बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी) निर्देशांकात भारताने थोडीशी प्रगती करून ४४वे स्थान मिळविले असले तरीही या निर्देशांकात भारत अजूनही तळालाच आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:06 AM2018-02-09T00:06:22+5:302018-02-09T00:08:04+5:30