नवी दिल्ली : अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक गेल्या ९ वर्षात प्रथमच व्याज दर वाढविण्याची शक्यता आहे, असे झाल्यास त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी सरकारने बहुस्तरीय उपाय केले आहेत. या परिणामाचा मुकाबला करण्यासाठी रिझर्व्ह बँकही तयार आहे, असे वित्त मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.याबाबत अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले की, भारताची देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत करणे हे सरकारचे ध्येय आहे. भांडवली बाजार आणि अन्य वित्तीय घडामोडी व्यवस्थित चालाव्यात हा त्यामागचा हेत आहे.येथे सुरू असलेल्या आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना जयंत सिन्हा म्हणाले की, फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवो, की अन्य कोणतीही वित्तीय घडामोड होवो, त्यांचा मुकाबला करण्यासाठी सरकारने बहुस्तरीय उपाययोजना आखली आहे.अमेरिकेत रोजगाराच्या आकड्यात सुधारणा झाल्याने तेथे फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सिन्हा यांचे हे वक्तव्य आले आहे. अमेरिकी फेडरल बँकेच्या निर्णयाचा मुकाबला करण्यास रिझर्व्ह बँक सज्ज आहे काय? असे विचारले असता सिन्हा म्हणाले की, गव्हर्नर रघुराम राजन यांना सर्व परिस्थितीची जाणीव आहे. जे काही होईल, त्याचा मुकाबला करण्यास रिझर्व्ह बँक तयार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत होणाऱ्या चढ- उताराला तोंड देण्यास भारत तयार आहे. आमची गंगाजळी चांगली असून, पायाभूत अर्थव्यवस्था मजबूत आहे.ईपीएफओने शेअर बाजारात १५ टक्के रक्कम गुंतवावीदेशांतर्गत बाजारातील तीव्र चढ-उतारांना नियंत्रित करण्यासाठी ईपीएफओने शेअर बाजारात पाच टक्क्यांऐवजी १५ टक्के रक्कम गुंतवावी, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटले आहे.येथे एका परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आपला इक्विटी बाजार स्थिर आणि व्यवस्थित राहावा, अशी आमची इच्छा आहे.गेल्या महिन्यापासून ईपीएफओने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत हे काम राज्ये आणि केंद्र सरकार करीत असत.
‘फेडरल’च्या निर्णयाच्या मुकाबल्यासाठी भारत सज्ज
By admin | Published: September 18, 2015 12:31 AM