Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोना संकटात आनंदाची बातमी! मोदी सरकारला मोठा दिलासा

कोरोना संकटात आनंदाची बातमी! मोदी सरकारला मोठा दिलासा

india real gdp growth to be 7.5 to 12.5 percent in 2021-22 predicts world bank: २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.५ ते १२.५ टक्के राहणार; जागतिक बँकेचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:52 PM2021-03-31T15:52:51+5:302021-03-31T15:54:52+5:30

india real gdp growth to be 7.5 to 12.5 percent in 2021-22 predicts world bank: २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.५ ते १२.५ टक्के राहणार; जागतिक बँकेचा अंदाज

india real gdp growth to be 7 5 to 12 5 percent in 2021 22 predicts world bank | कोरोना संकटात आनंदाची बातमी! मोदी सरकारला मोठा दिलासा

कोरोना संकटात आनंदाची बातमी! मोदी सरकारला मोठा दिलासा

नवी दिल्ली: देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. मात्र या परिस्थितीतही जागतिक बँकेनं जीडीपी वाढीचा वेग जास्त असेल, असा अंदाज वर्तवला आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.५ टक्के ते १२.५ टक्के इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. जागतिक बँकेनं दक्षिण आशिया वॅक्सीनेट्स अहवालात याबद्दलची माहिती दिली आहे. (india real gdp growth to be 7.5 to 12.5 percent in 2021-22 predicts world bank)

१ एप्रिलपासून बदलणार ‘हे’ १० नियम; नोकरदारांच्या पगारात बदल होणार?

२०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी ७.५ ते १२.५ टक्के वेगानं वाढेल, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. मात्र हा विकास दर पूर्णपणे कोरोना लसीकरणावर अवलंबून असेल. येत्या काही महिन्यांत शेअर बाजारात तेजी पाहायला मिळेल, असा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे. 'पर्यटन, व्यापार, बांधकाम क्षेत्रांवर लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळाला. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मार्च ते जून २०२० या कालावधीत लॉकडाऊन सुरू होता. त्याचा थेट परिणाम आर्थिक व्यवहारांवर पाहायला मिळाला,' असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.

अन्य एजन्सी, संस्थांनी वर्तवलेला अंदाज-
फिच- १२.८ टक्के
मूडीज- १२ टक्के
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी- ११.५ टक्के
केयर रेटिंग्स- ११-११.२ टक्के
एस एँड पी - ११ टक्के
आरबीआय- १०.५ टक्के

सध्याच्या घडीला देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे. परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. काल देशात ५६ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापैकी २८ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय पंजाब, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेशमधील परिस्थितीदेखील गंभीर आहे.
 

Read in English

Web Title: india real gdp growth to be 7 5 to 12 5 percent in 2021 22 predicts world bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.