मॉस्को : आगामी दशकात म्हणजे २०१५ पर्यंत द्विपक्षीय व्यापार तीन पटीने वाढवून तो ३० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्यावर भारत आणि रशिया यांनी येथे चर्चा केली.
भारत आणि रशिया यांच्या आंतरसरकारी सल्लागार समितीची २१ वी बैठक मंगळवारी येथे पार पडली. यावेळी भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि रशियाचे उपपंतप्रधान डिमित्री रॉगझीन यावेळी उपस्थित होते. या बैठकीत हा विचार २०१५ पर्यंत उभय देशांतील थेट गुंतवणूक १५ अब्ज डॉलरनी वाढविण्यासाठी काय करता येईल, यावर त्यांनी विचार केला. हे व्यापारी ‘लक्ष्य’ साध्य करण्यासाठी विविध क्षेत्रांचा त्यांनी यावेळी शोध लावला. गेल्यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात झालेल्या शिखर परिषदेनुसार या मुद्यांवर चर्चा झाली.
२०१४ मध्ये दोन्ही देशांत ९.५१ अब्ज अमेरिकी डॉलरचा व्यापार झाला आहे. भारताची निर्यात ३.१७ अब्ज डॉलरची, तर रशियातून आयात ६.३४ डॉलरची झाली आहे. कृषी, औषधी आणि पायाभूत सेवा आदी क्षेत्रांत आर्थिक सहकार्य बळकट करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
१२ रशियन अणुप्रकल्प भारताने खरेदी करण्याबाबत मोदी- पुतीन यांच्यात निर्णय झाला होता. भारताने अणुप्रकल्प खरेदी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. भारत अणुऊर्जेचा शांततामय कारणांसाठी उपयोग करतो. त्यात रशिया हा भारताचा महत्त्वाचा सहकारी आहे.
भारत-रशिया २०१५ पर्यंत व्यापार तीन पटीने वाढविणार
आगामी दशकात म्हणजे २०१५ पर्यंत द्विपक्षीय व्यापार तीन पटीने वाढवून तो ३० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्यावर भारत आणि रशिया यांनी येथे चर्चा केली.
By admin | Published: October 22, 2015 03:31 AM2015-10-22T03:31:29+5:302015-10-22T03:31:29+5:30