UPI Payment in New Zealand: भारत आणि न्यूझीलंड व्यवसायाच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवर (UPI) प्राथमिक चर्चा करत आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार आणि पर्यटनासाठी न्यूझीलंडमध्ये यूपीआय सुरू करण्याचा विचार केला जात असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं मंगळवारी सांगितलं. सोमवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि निर्यात विकास मंत्री डॅमियन ओ'कॉनर यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
दोन्ही देशांत चर्चा"दोन्ही मंत्र्यांनी युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीसंदर्भात एनसीपीआय आणि पेमेंट्स न्यूझीलंजदरम्यान सुरू असलेल्या प्राथमिक चर्चेचं स्वागत केलं आणि या मुद्द्यावर चर्चा सुरू ठेवली पाहिजे. न्यूझीलंडमध्ये युपीआयची सुरुवात झाल्यास दोन्ही देशांदरम्यान व्यापार करणं सोपं होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल," असं बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनाद्वारे सांगण्यात आलं.
या देशांत युपीआयसंयुक्त अरब अमिराती, भूतान आणि नेपाळ यापूर्वीपासूनच युपीआय पेमेंट प्रमाणाचा वापर करत आहेत. एनसीपीआय इंटरनॅशनल अमेरिका, युरोपियन देश आणि पश्चिम आशियात सेवांचा विस्तार करण्यासाठी चर्चा करत आहे. भारतानं आता न्यूझीलंडमध्ये आंब्याची निर्यात सुरू केली आहे. दोन्ही देशांनी किवी फळासह कृषी आणि फलोत्पादन, औषधनिर्माण, प्रक्रिया, साठवणूक आणि वाहतूक या क्षेत्रातील संभाव्य तांत्रिक सहकार्यावरही चर्चा केली.