Join us  

भारताने दाखविला जगाला विकासाचा मार्ग, डॉ. विजय दर्डा यांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 1:32 PM

Lokmat News: जागतिक अर्थव्यवस्थेपुढे निर्माण झालेल्या प्रतिकूल आव्हानांना सामोरे जात भारताची अर्थव्यवस्था जगभरातील देशांना विकासाचा मार्ग दाखवत आहे. याचे मुख्य कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, नेतृत्व, तसेच अर्थमंत्रालयाची दूरदृष्टी आहे.

नवी दिल्ली - जागतिक अर्थव्यवस्थेपुढे निर्माण झालेल्या प्रतिकूल आव्हानांना सामोरे जात भारताची अर्थव्यवस्था जगभरातील देशांना विकासाचा मार्ग दाखवत आहे. याचे मुख्य कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, नेतृत्व, तसेच अर्थमंत्रालयाची दूरदृष्टी आहे. त्यामुळे गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत असल्याचे उद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढले.

राज्यसभेचे माजी खासदार आणि लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा आणि व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. सीतारामन यांनी अलीकडेच जी-२० देशांच्या संमेलनात अध्यक्षपद भूषविले आणि त्यांच्या सूचनांचा संमेलनाने स्वीकार केल्याबद्दल डॉ. दर्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर, वॉशिंग्टन डीसी येथे जागतिक आव्हानांवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला संबोधित केल्याबद्दलही त्यांचे अभिनंदन केले.

जगभरातील देशांवर आर्थिक मंदीचे सावट गडद झाले आहे. विकास दर गडगडत आहे, पण याच काळात भारताची अर्थव्यवस्था जगाला आशेचा किरण दाखवत आहे. रुपया स्थिर आहे. 

लोकमत बँकिंग कॉन्क्लेव्ह २०२३ मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण

■ देवेंद्र दर्डा यांनी देशात व्यवसायांना चालना देऊ शकणाऱ्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकणाऱ्या इझ ऑफ डुइंग बिझनेस संबंधात काही सूचना अर्थमंत्री सीतारामन यांना केल्या.

ग्राहकांच्या आर्थिक हितरक्षणासाठी लोकमत समूहाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या लोकमत बँकिंग कॉन्क्लेव्ह २०२३ मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण डॉ. विजय दर्डा यांनी अर्थमंत्री सीतारामन यांना दिले.

डिपॉझिटर्स इंटरेस्ट प्रोटेक्शन थ्रू प्रोफेशनलिझम या विषयावर पुणे येथे या कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात येत आहे.

आणि गुंतवणूकदार भारतात येत आहे. या कालखंडात अर्थव्यवस्था सुदृढ राखणे आव्हान आहे. अर्थव्यवस्था गडगडल्यास सर्वच वर्ग प्रभावित झाले असते. रशिया-युक्रेन संघर्षाच्या जागतिक प्रभावानंतरही भारताने ज्या प्रकारे मुत्सद्देगिरी व अर्थनीतीमध्ये समन्वय साधला तो प्रशंसनीय असल्याचे नमूद करून डॉ. दर्डा यांनी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :निर्मला सीतारामनविजय दर्डा