नवी दिल्ली- भारताकडून जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था होण्याचा मान काढून घेण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा दृष्टीनं भारताची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं वर्षं 2018मध्ये सुस्त राहिल्यानं त्याचा मोठा भुर्दंड देशाला बसला आहे. जागतिक बँकेच्या आकड्यांनुसार वर्ष 2018मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे. त्यामुळेच या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पछाडत पुढे जाण्याचा मान मिळवला आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर सहाव्या क्रमांकावर फ्रान्स कब्जा मिळवला आहे. जिथे भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावरून घसरून सातव्या क्रमांकावर गेली असून, अमेरिका या यादीत नंबर वनवर कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर वर्षं 2018मध्ये 3.01 टक्क्यांनीच वाढला आहे. तर वर्षं 2017मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत 15.23 टक्क्यांची वाढ झाली होती. त्याचप्रमाणे ब्रिटनची अर्थव्यवस्थेच्या विकासदरात 6.81 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तिच्या अर्थव्यवस्थेत 2017मध्ये फक्त 0.75 टक्के एवढीच वाढ झाली होती. दुसरीकडे फ्रान्सची अर्थव्यवस्था 2018मध्ये 7.33 टक्क्यांनी वाढली आहे. जी 2017मध्ये फक्त 4.85 टक्क्यांपर्यंत वाढली होती.
अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था 2017च्या तुलनेत 2018मध्ये घसरल्यानं भारताचा क्रमांकही मागे पडला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 2017मध्ये जवळपास 18 हजार खरब एवढी उडी घेतली होती. तर त्यावेळी ब्रिटन सहाव्या क्रमांकावर, तर फ्रान्स 7व्या क्रमांकावर होते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत असल्यानं भारताची घसरण झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
भारत नाही राहिली जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था, घसरली या क्रमांकावर
भारताकडून जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था होण्याचा मान काढून घेण्यात आला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 10:18 AM2019-08-02T10:18:04+5:302019-08-02T10:18:15+5:30