नवी दिल्ली - ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताने सलग दुसऱ्या वर्षी मोठी झेप घेतली आहे. व्यवसाय करण्यासाठी सुलभ असलेल्या देशांच्या जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या क्रमवारीत 23 स्थानांची प्रगती करत भारताने 77 वे स्थान पटकावले आहे. गतवर्षी या क्रमवारीत भारत 100 व्या क्रमांकावर होता. गेल्या दोन वर्षांत व्यवसाय सुलभ देशांच्या क्रमवातील भारताचे स्थान 23 क्रमांकांनी सुधारले आहे.
In a first for South Asia, 2 of the region’s economies earned coveted spots in the global top improvers. India continued its reform agenda and advanced 23 spots to 77th place. India is now the region’s top-ranked economy: World Bank on 'Ease of Doing Business' ranking
— ANI (@ANI) October 31, 2018
व्यवसायांसाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या 190 देशांची क्रमवारी जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात येत असते. या क्रमवारीमध्ये 2014 साली भारत 142 व्या क्रमांकावर होता. त्यानंतरच्या काळात भारताने या क्रमवारीत सातत्याने सुधारणा केली आहे. गतवर्षी या क्रमवारीत भारताने 30 स्थानांनी प्रगती केली होती. भारताची या क्रमवारीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी झेप होती. यावर्षीही भारताच्या क्रमवारीत 23 स्थानांची प्रगती झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इज ऑफ डुइंग बिझनेसच्या क्रमवारीत पुढच्या दोन वर्षांत अव्वल 50 देशांमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
India has done it again! Under the able leadership of Hon'ble PM Shri @narendramodi ji, India jumped the #EaseofDoingBusinessRankings by 23 this year to be ranked at 77. #IndiaMeansBusiness#EoDBpic.twitter.com/BojYOBJAQv
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) October 31, 2018