भारत 2030 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून समोर येईल. याच बरोबर 2026-27 या अर्थवर्षात देशाचा जीडीपी सात टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. एसअँडपी ग्लोबल रेटिंग्सने मंगळवारी यासंदर्भात भाष्य केले आहे. तसेच, मोठ्या संधी'चा फायदा घेणे आणि स्वतःला पुढील मोठे जागतिक मॅन्यूफॅक्चरिंग सेंटर बनवणे, ही देशासाठी मोठी परीक्षा आहे, असा एसअँडपीचा अंदाज आहे.
जगाची फॅक्ट्री बनू शकतो भारत - एसअँडपीच्या अहवालानुसार, 'ग्लोबल क्रेडिट आउटलुक 2024: न्यू रिस्क, न्यू प्लेबुक' मध्ये म्हटल्याप्रमाणे, मार्च 2024 अर्थात चालू आर्थिक वर्षात जीडीपी ग्रोथ रेट 6.4 टक्के राहील, असा अंदाज आहे. तर 2026 मध्ये तो सात टक्क्यांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत 7.2 टक्के दराने वाढ झाली होती. भारताच्या जीडीपीमध्ये जून आणि सप्टेंबरच्या तिमाहीत अनुक्रमे 7.8 टक्के आणि 7.6 टक्के वाढ झाली होती.
2030 पर्यंत भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था -या संस्थेनुसार, 'भारत 2030 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी तयार आहे. तसेच तो पुढील तीन वर्षांत सर्वात वेगाने वाढणारी अर्थ व्यवस्था असेल. सर्वात मोठी परीक्षा म्हणजे, भारत पुढील मोठे जागतिक उत्पादन केंद्र बनू शकते का? जी एक मोठी संधी आहे.' महत्वाचे म्हणजे, आर्थिक वर्ष 2022-23 च्या अखेर पर्यंत भारताच्या GDP चा आकार 3,730 अब्ज अमेरिकन डॉलर एवढा राहिला आहे.
आता आहे जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था -सध्या भारत अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. IMF अंदाजानुसार, भारत 2027-28 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर एवढ्या जीडीपीसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल.