Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजकाल मोठ्या बँका बुडतायेत, तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा?

आजकाल मोठ्या बँका बुडतायेत, तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा?

आजकाल अमेरिकेच्या अचानक बुडलेल्या बँकांनी 2008 च्या आर्थिक संकटाची आठवण करून दिली आहे. तसेच, बँकिंग व्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 04:11 PM2023-03-17T16:11:25+5:302023-03-17T16:15:17+5:30

आजकाल अमेरिकेच्या अचानक बुडलेल्या बँकांनी 2008 च्या आर्थिक संकटाची आठवण करून दिली आहे. तसेच, बँकिंग व्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

india to usa uk singapore japan china australia how much bank deposit is safe | आजकाल मोठ्या बँका बुडतायेत, तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा?

आजकाल मोठ्या बँका बुडतायेत, तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा?

नवी दिल्ली : अमेरिकेत गेल्या काही आठवड्यात 3 मोठ्या बँका बुडाल्या आहेत. एसव्हीबी फायनान्शियल ग्रुप (SVB Financial Group) आणि सिल्वरगेट कॅपिटल कॉर्प (Silvergate Capital Corp) नंतर आता सिग्नेचर बँक (Signature Bank) देखील न्यूयॉर्क स्टेट फायनान्शियल रेग्युलेटर्सनी बंद केली आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) नुसार, 2001 पासून 563 यूएस बँक अपयशी ठरल्या आहेत. 

आजकाल अमेरिकेच्या अचानक बुडलेल्या बँकांनी 2008 च्या आर्थिक संकटाची आठवण करून दिली आहे. तसेच, बँकिंग व्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, एखादी बँक जरी बुडली तरी त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आणि त्यांना काय मिळणार? तुम्हाला माहिती आहे का की बँक बुडली तरी तुमचे पैसे एका मर्यादेपर्यंत सुरक्षित राहतात. कोणत्या देशात बँक ठेवींवर किती सुरक्षा मिळते, ते जाणून घ्या.

भारतात 5 लाखांपर्यंतची हमी देते सरकार 
भारतातील बँक बुडाली किंवा दिवाळखोरी झाल्यास ठेवीदाराला मिळणारा एकमेव दिलासा म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच डीआयसीजीसीद्वारे (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) देण्यात येणारे विमा संरक्षण असते. आता डीआयसीजीसी अंतर्गत विमा संरक्षण 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच, ज्या बँक खात्यात तुमचे पैसे जमा झाले आहेत, ते जर बुडले तर तुम्हाला 5 लाख रुपये परत मिळतील, जरी खात्यात जमा केलेली रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असली तरीही.

या देशांमध्ये बँक ठेव किती सुरक्षित आहे?
- अमेरिके 2.50 लाख डॉलरपर्यंतच्या (सुमारे 2,06,91,950 रुपये) ठेवींवर विमा संरक्षण मिळते.
- ब्रिटनमध्ये बँक ग्राहकांना 85,000 पौंडपर्यंतच्या (सुमारे 84,73,070 रुपये) ठेवींवर विमा संरक्षण मिळते. 
- सिंगापूरमध्ये 75,000 सिंगापूर डॉलर्सपर्यंतच्या (सुमारे 46,07,260 रुपये)  ठेवी सुरक्षित असतात.
- जपानमध्ये 1 कोटी जपानी येनपर्यंतची (सुमारे 62,37,030 रुपये)  मर्यादा सुरक्षित आहे.
- चीनमधील लोकांना 5,00,000 युआनपर्यंतच्या (सुमारे 60,02,420 रुपये) ठेवींवर विमा संरक्षण मिळते.
- ऑस्ट्रेलियामध्ये, 2,50,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सपर्यंत (सुमारे 1,37,42,500 रुपये)  संरक्षण दिले जाते.
- हाँगकाँगमधील बँक ग्राहकांना 5 लाख हाँगकाँग डॉलरपर्यंतच्या(सुमारे 52,73,075 रुपये) ठेवींवर विमा संरक्षण मिळते. 
- दक्षिण कोरियामध्ये ठेवींवर विम्याची मर्यादा 5 कोटी वॉन (सुमारे 31,54,735 रुपये) आहे.
- मलेशियातील बँक ठेवींवर 2.5 लाख रिंगिटपर्यंत (सुमारे 46,28,930 रुपये)  विमा संरक्षण उपलब्ध आहे.

Web Title: india to usa uk singapore japan china australia how much bank deposit is safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.