Lokmat Money > बिझनेस न्यूज > चिनी उत्पादनांच्या बहिष्कार मोहिमेला आजपासून सुरूवात, एक लाख कोटींचा झटका देण्याची तयारी

चिनी उत्पादनांच्या बहिष्कार मोहिमेला आजपासून सुरूवात, एक लाख कोटींचा झटका देण्याची तयारी

boycott china product movement : कॅटचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकल फॉर व्होकल आणि आत्मनिर्भर भारतचे आवाहन यशस्वी करण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 06:24 PM2021-07-21T18:24:32+5:302021-07-21T18:26:12+5:30

boycott china product movement : कॅटचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकल फॉर व्होकल आणि आत्मनिर्भर भारतचे आवाहन यशस्वी करण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

india traders start boycott china product and chinese goods movement from today to reduce import of one lakh crore | चिनी उत्पादनांच्या बहिष्कार मोहिमेला आजपासून सुरूवात, एक लाख कोटींचा झटका देण्याची तयारी

चिनी उत्पादनांच्या बहिष्कार मोहिमेला आजपासून सुरूवात, एक लाख कोटींचा झटका देण्याची तयारी

नवी दिल्ली : गेल्या वर्षी सुरू झालेला चीनी उत्पादनांच्या बहिष्कार मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून पुन्हा सुरू केला जात आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने आज देशभरात 'भारतीय वस्तू - आमचा अभिमान' या घोषणेसह चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केली. यामध्ये डिसेंबर 2021 पर्यंत चीनमध्ये उत्पादित वस्तूंची भारतात आयात एक लाख कोटींनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. (india traders start boycott china product and chinese goods movement from today to reduce import of one lakh crore)

कॅटचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकल फॉर व्होकल आणि आत्मनिर्भर भारतचे आवाहन यशस्वी करण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, या टप्प्यात एफएमसीजी उत्पादने, दैनंदिन वस्तू, किराणा, पादत्राणे, खेळणी, स्वयंपाकघर उपकरणे, क्रॉकरी, गिफ्ट, फर्निचर फॅब्रिक्स या वस्तू  ज्या अद्याप चीनमधून आयात केल्या जात आहेत, यावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याची योजना तयार केली आहे.

याचबरोबर, चीनमधून आयात केलेल्या या वस्तू बर्‍याच काळापासून भारतात तयार केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत भारतीय व्यापारी आणि खरेदीदारांना चिनी वस्तूऐवजी भारतीय वस्तूंची विक्री व खरेदी करण्याची विनंती केली जाईल, असे खंडेलवाल म्हणाले. तसेच, बीसी भारतीया म्हणाले की, चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात चार प्रकारच्या वस्तूंची आयात केली जाते, ज्यात तयार वस्तू म्हणजेच फिनिश्ड गुड्स, कच्चा माल अर्थात रॉ मटेरिअल, सुटे भाग आणि तांत्रिक उत्पादने यांचा समावेश आहे.


चीनमधून 20 वर्षांत 3500 टक्के आयात
भारतात 2001साली चिनी वस्तूंची आयात फक्त 2 अब्ज डॉलर्स होती, जी आता वाढून 70 अब्ज डॉलर्स झाली आहे, म्हणजे केवळ 20 वर्षांत चीनकडून आयातमध्ये 3500 टक्के वाढ झाली आहे. हे स्पष्टपणे दिसून येते की विचारविनिमय योजनेअंतर्गत चीन भारताचा किरकोळ बाजार हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्याला भारतातील व्यापारी आणि नागरिक कोणत्याही प्रकारे यशस्वी होऊ देणार नाहीत.

या मोहिमेत आठ कोटी व्यापारी सहभाग घेतील
सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये 40 हजाराहून अधिक व्यावसायिक संघटना आणि त्यांच्याशी संबंधित 8 कोटी व्यापारी भाग घेतील. या मोहिमेअंतर्गत व्यापारी आणि ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. देशातील 138 कोटी लोकांचा पहिला संपर्क देशभरातील कोणत्याही व्यापाऱ्याच्या दुकानात आहे, अशा परिस्थितीत व्यापारी त्यांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संदेशही देतील, असे खंडेलवाल म्हणाले.

Web Title: india traders start boycott china product and chinese goods movement from today to reduce import of one lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.