लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोबाइल उत्पादनात भारताने जोरदार मुसंडी मारल्यामुळे या क्षेत्रातील चीनच्या दबदब्यास सुरुंग लागला आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या मोबाइलसाठी लागणारे सुटे भाग पूर्वी चीनमधूनच येत असत. मात्र अलीकडे भारताने चीनवरील अवलंबित्व कमी करून व्हिएतनाम आणि अमेरिकेसारख्या देशातून चिपसेट मागविण्याचे नियोजन केले. त्यामुळे चीनचा उद्योग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
भारत सरकारच्या पीएलआय योजनेमुळे चिप उत्पादक कंपन्या भारतात येत आहेत. त्यामुळे चीनची सर्वांत मोठी कंपनी ‘सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इंटरनॅशनल काॅर्पोरेशन’ला चौथ्या तिमाहीत ५५ टक्के नुकसान सहन करावे लागले.