वॉशिंग्टन - व्यापारी व आर्थिक वादावर तोडगा काढण्यासाठी अधिकारी पातळीवर चर्चा करण्याचे भारत व अमेरिका यांनी मान्य केले आहे. भारत आमच्या काही उत्पादनांवर १०० टक्के कर लावीत असल्याचा आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच केला होता.दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असताना भारताचे वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी अमेरिकी वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकी व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटायझर यांचीही या वेळी उपस्थिती होती. सुरेश प्रभू म्हणाले, द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी आम्ही आता एकत्रित काम करू. व्यापार व आर्थिक बाबींशी संबंधित वाद सोडविण्यासाठी चर्चाही करू. यासंबंधीचा तपशील ठरविण्यासाठी भारतीय अधिकाºयांचे पथक लवकरच अमेरिकेला जाईल.अमेरिका दौरा आटोपताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रभू यांनी सांगितले, व्यापार आणि कर याबाबतीत दोन्ही देशांचे काही मुद्दे आहेत. अधिकारी त्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील. अमेरिकेचे कृषिमंत्री सॉनी पेरड्यू यांचीही प्रभू यांनी भेट घेतली.सकारात्मक भूमिकाभारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सिंग सरणा यांनी सांगितले, भारत सरकारने अमेरिकेला स्टील आणि अॅल्युमिनियमवरील करांबाबत लिहिले आहे.या धातूंवरील कर माफ करण्याचा आग्रह भारताने अमेरिकेकडे धरला आहे. याबाबतीत दोन्ही देशांचा वार्तालाप सकारात्मक आहे.
भारत-अमेरिका करणार व्यापाराच्या मुद्द्यांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:53 AM